आपला चेहरा कायम फ्रेश आणि तजेलदार दिसावा असं आपल्याला वाटतं. चेहऱ्यावर डाग पडले, सुरकुत्या आल्या किंवा त्वचा कोरडी-निस्तेज झाली की आपण अस्वस्थ होतो. मग कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटस घेतल्या जातात तर कधी महागडी उत्पादने आणून मेकअप करुन चेहऱ्याचा मेकअप केला जातो. पण आपली त्वचा नैसर्गिकरित्याच सुंदर आणि चमकदार असेल तर असे काहीच करावे लागत नाही. यासाठी आहारातून त्वचेचे उत्तम पोषण होणे, पोट साफ असणे, नियमित व्यायाम आणि त्वचेची किमान काळजी घेणे आवश्यक असते. मात्र तरीही त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसत असेल तर चेहऱ्याला लावण्यासाठी आपण घरच्या घरी क्रीम तयार करु शकतो (How To Make Home Made Cream For Glowing Skin).
१. होममेड कोको बटर क्रिम
४ चमचे कोको बटर, १ चमचा गुलाब पाणी, २ चमचे खोबरेल तेल आणि २ चमचे व्हर्जिन ऑईल एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करुन ते चांगले गरम करा. गॅस बंद करुन हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हे क्रिम एका डबीत काढून ठेवा आणि रोज सकाळ - संध्याकाळ चेहऱ्यावर लावा.
२. अॅलोवेरा क्रिम
आपली त्वचा स्मूथ आणि शायनी असावी असं वाटत असेल तर त्वचेचे एक्सफॉलिएशन होणे महत्त्वाचे असते. कोरफडीमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होतो. ४ चमचे कोरफडीचा गर, २ चमचे खोबरेल तेल चांगले एकजीव करुन घ्या. यामध्ये व्हिटॅमिन इ तेल घालून मिश्रण काही वेळ हाताने किंवा ब्लेंडरने एकजीव करा. यामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही इसेन्शियल ऑईल मिसळा आणि हे क्रिम चेहऱ्यावर लावा.