केस गळण्याची समस्या आजकाल सर्वांनाच उद्भवते. केमिकल्सयुक्त शॅम्पू, तेल यामुळे केसांचा पोत बिघडतो आणि केस जास्त गळू लागतात. (Hair Care Tips) केसांच्या समस्या टाळण्यासाठी नैसर्गिक तेलांचा वापर केला तर फॉलिकल्स मजबूत करता येतात याशिवाय स्काल्पचा कोरडेपणाही दूर होतो. (Homemade oils for healthy hair) यामुळे केसांची चांगली वाढ होते. (Two oil recipes to stop hair fall) केसांच्या चांगल्या वाढीसाठी घरगुती तेल बनवणयाची सोपी पद्धत पाहूया. (How to make homemade hair oil)
१) जास्वंद आणि नारळाचं तेल
साहित्य - नारळाचं तेल १ कप, कढीपत्त्याची पानं १ मूठ, आवळे १ ते २, मेथी दाणे २ चमचे, जास्वंदाची फूलं 2 ते 3.
तेल बनवण्याची योग्य पद्धत
सगळ्यात आधी एक भांडं घेऊन त्यात नारळाचं तेल घाला. आता त्यात कढीपत्ता, आवळा, मेथीदाणे आणि जास्वंदाची फुलं घालून वरून बंद करा. रोज १ ते २ तास उन्हात ठेवा नंतर एका आठवड्यानं हे तेल केसांना लावा. याव्यतिरिक्त नारळाचं तेल पॅनमध्ये घालू मंद आचेवर ठेवा त्यात कढीपत्ता, आवळा, मेथीदाणे आणि जास्वंदाचे फूल घाला. हे तेल मंद आचेवर २५ ते ३० मिनिटांसाठी ठेवा. जेव्हा तेलाचा रंग पूर्णपणे बदललेल तेव्हा गॅस बंद करून थंड करा मग गाळून घ्या. त्यावेळी गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी ठेवा. नंतर तेल गाळून केसांना लावा.
केसांना तेल कसे लावावे?
एका वाटीत ३ ते ४ चमचे तेल घालून त्याला गरम पाण्याच्या बाऊलच्या मध्ये ठेवा. ही वाटी पाण्यावर तरंगायला हवी. नंतर हलक्या हातानी हे तेल केसांना लावा आणि स्काल्पवर मसाज करा. हे तेल केसांमध्ये २ ते ३ तासांसाठी लावलेले राहू द्या. तुम्ही रात्रभर सुद्धा हे तेल लावलेलं राहू देऊ शकता. यानंतर माईल्ड शॅम्पूं केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलानं मसाज करा. यामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत राहण्यास मदत होते.
2) भृंगराज नीम ऑईल
हे तेल बनवण्याासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये नारळाचं तेल आणि कॅस्टर ऑईल मिसळून घ्या आणि मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर तेलात ब्राम्ही, भृंगराज, मेथीचे दाणे, आवळा, कढीपत्ते मिसळा आता यात जास्वंदाची २ ते ३ फुलं घाला. मंद आचेवर १५ ते २० मिनिटांसाठी शिजवत राहा. तेलाचा रंग हलका बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. नंतर हे तेल एका बरणीमध्ये भरून घ्या.
तेल लावण्याची योग्य पद्धत
केसांना लावण्याआधी हे तेल हलके गरम करा. नंतर केस २ भागात डिव्हाईड करा. यामुळे केसांच्या फॉलिकल्सना पोषण मिळते. स्काल्पला तेल लावल्यानं केसांवर जमा झालेली घाण दूर होते आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका टळतो. १ ते २ तासांनी कोणत्याही हर्बल शॅम्पूने धुवा यामुळे केसांची वाढ होते.