केस गळण्याचा (Hair Care Tips) त्रास सध्या खूपच कॉमन झाला आहे. केस गळतीमुळे सध्या अनेक समस्या उद्भवतात. एकदा केस गळायला सुरूवात झाली की काही केल्या हा त्रास थांबतच नाही. केसांवर उपाय म्हणून मुली वेगवेगळ्या प्रकारचे, शॅम्पू, तेल बदलून पाहतात. (Hair Growth Tips) घरच्याघरी नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. केसांसाठी होममेड सोप्या पद्धतीने करावे ते समजून घेऊ. (How To Stop Hair Fall)
केसांसाठी होममेड सिरम कसे तयार करावे? (How To Make Homemade Hair Serum)
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात १ चमचा तांदूळ घाला, १ चमचा आळशीच्या बीया घाला, १ चमचा मेथीच्या बीया, १ चमचा कढीपत्ता घालून मिश्रण उकळवून घ्या. उकळलेलं हे द्रावण थंड झाल्यानंतर एका भांड्यात गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. (Homemade Serums For All type Of Hairs Hair Growth)
पाणी आणि त्यातील पदार्थ वेगळे करा. यात १ चमचा नारळाचे तेल घाला. या तेलाने डोक्याची व्यवस्थित मसाज करा. घरी बनवलेलं हे तेल लावून डोक्याची समाज करा. त्यानंतर केस शॅम्पू आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाका. या मिश्रणाने केस सिल्की, दाट आणि शायनी होतील.
केसांची काळजी कशी घ्यावी? (How To Take Care Of Hairs)
ऑयलिंग केसांसाठी एक महत्वपूर्ण भाग आहे. यासाठी तुम्ही नियमित स्वरूपात कोमट तेलाने केसांची मसाज करा. ४० ते ४५ मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. ज्यामुळे हेअर फॉलची समस्या उद्भवत नाही. केसांना निरोगी ठेवण्यासाठी हर्बल शॅम्पूचा वापर करा. हर्बल शॅम्पूचा वापर केल्याने स्काल्पची चांगला राहील.
अचानक BP वाढलं तर काय कराल? डॉक्टरांनी सांगितला BP कंट्रोलसाठी व्यायाम; ६ सेकंदात नॉर्मल व्हाल
केसांना कंडिशनर लावणं तेव्हढंच गरजेचं आहे जितकं तेल लावणं. शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावा. जवळपास ५ ते १० मिनिटं केसांना हे कंडिशनर लावून ठेवा. ज्यामुळे केस तुटण्याची समस्या कमी होते. केस सुकवण्यासाठी स्वच्छ टॉवेलचा वापर करा.
पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी
१५ ते २० मिनिटांनंतर टॉवेल काढून टाका आणि केस नैसर्गिकरित्या सुकू द्या. आपल्या हातावर हेअर सिरमचे काही थेंब घाला त्यानंतर हलक्या हाताने केसांच्या लांबीला लावा. केसांवर प्लास्टीकचा कंगवा वापरू नका. आपले गुंतलेले केस सोडवण्यासाठी लाकडाच्या कंगव्याचा वापर करा.
कडुलिंबाच्या पानांनी बनलेल्या कंगव्याचा वापर तुम्ही करू शकता. यात औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्प बॅक्टेरिया फ्री आणि निरोगी राहते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहारात घ्या. आहारात मल्टीव्हिटामीन, हिरव्या भाज्या, फळं आणि कडधान्यांचा समावेश करा.