दिवाळी सणाची सुरुवात होते ती अभ्यंगस्नानानेच. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे असते. दिवाळी सण म्हणजे रोषणाई, सजावट, दिव्यांची आरास, रांगोळी, फराळ यांसोबत सुगंधी उटणेही तितकेच महत्वाचे असते. विविध सुंगधीत आणि औषधी वनस्पती वापरुन उटणे (Diwali Utane Recipe) तयार करतात. आपल्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी उटणे व तेल अंगाला लावून मगच अभ्यंगस्नान केले जाते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरात उटणं (Shahi ubtan) हे घरीच बनवलं जात असे.
जसजसा काळ बदलत गेला तसे उटणं विकत आणण्याची पद्धत सुरु झाली. सध्या बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे उटणे विक्रीसाठी उपलब्ध असतात. बाजारात मिळणाऱ्या या उटण्यांमध्येही बऱ्याचदा काही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता ही असते. अशावेळी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी घरच्या घरीच तयार केलेले उटण्यांचा (homemade shahi ubtan for super glowing and bright skin) वापर केला तर ते अधिक फायदेशीर ठरते. आजकाल घाईगडबडीच्या दिवसांत अनेकजण बाजारातून विकतची उटणं (Homemade Utane) घेऊन येतात. त्यामुळे यंदा बाजारातून विकतचे उटणं आणण्यापेक्षा घरीच उटणं करून पाहूयात(How to make a Perfect Utna).
उटणं बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. मुलतानी माती - २ टेबलस्पून २. चंदन पावडर - २ टेबलस्पून ३. चणा डाळीचे पीठ - १/२ कप ४. मसूर डाळीचे पीठ - १/२ कप ५. कचोरा पावडर - १ टेबलस्पून ६. आवळा पावडर - १ टेबलस्पून ७. वाळा पावडर - १ टेबलस्पून ८. अनंतमूळ पावडर - १ टेबलस्पून ९. गुलाब पावडर - १ टेबलस्पून १०. आंबेहळद - १ टेबलस्पून ११. नागरमोथा पावडर - १ टेबलस्पून १२. कडुलिंबाची पावडर - १ टेबलस्पून
सणासुदीसाठी मेकअप करताना ४ सोप्या स्टेप्समध्ये फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत, चेहरा दिसेल उजळ...
वारंवार केसांना हेअर कलर करूनही केसांचा रंग फिकट होऊ नये म्हणून ७ चुका टाळा...
कृती :-
१. उटणं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यातील बेसन, मसूर डाळ पीठ, कडुलिंब पाडवर सोडून सर्व साहित्य एकत्रित करुन मिक्स करून घ्यावे. २. त्यानंतर सर्व एकत्र केलेले हे मिश्रण चाळून घ्या म्हणजे त्वचेला त्रास होणार नाही आणि त्याचा उत्तम स्क्रब म्हणून वापर करता येईल. ३. आता या चाळून घेतलेल्या मिश्रणात बेसन, मसूर डाळ पीठ, कडुलिंब पाडवर घालावी. या सगळ्या पावडर एकजीव करुन घ्याव्यात.
४. या मिश्रणामध्ये त्वचेला अधिक चांगले मॉइश्चराइज करता यावे म्हणून दूध, गुलाबपाणी आणि पाणी मिक्स करून उटण्याची घट्टसर पेस्ट तयार करुन घ्यावी. ५. आपण हे तयार घरगुती उटणे दिवाळीतच नाही तर इतरही दिवशी आठवड्यातून २ वेळा वापरू शकता.
शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...
उटण्यांमध्ये हे सर्व साहित्य वापरताना यातील कोणत्याही गोष्टीची आपल्या त्वचेला ऍलर्जी नाही याची सर्वातआधी खात्री करुन घेऊन पॅच टेस्ट करा आणि मगच त्याचा वापर करावा.