आपल्या मेकअपला एक कम्प्लिट लूक देण्याचं काम काजळ करतं. जोपर्यंत डोळ्यात आपण काजळ घालत नाही, तोपर्यंत मेकअप काही उठून दिसत नाही. हल्ली बाजारात मिळणारे काजळ आपण सर्रास वापरतो. त्यासाठी अगदी वाटेल ती किंमतही मोजतो. पण घरच्याघरी अगदी कमी पैशांत, कमी वेळेत उत्तम दर्जाचं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कोणतेही केमिकल्स नसणारं काजळ तयार होऊ शकतं (simple method of making chemical free kajal). ते कसं तयार करायचं, ते आता पाहूया...(How to make kajal at home) या आयुर्वेदिक पद्धतीने आपल्याकडे फार प्राचीन काळापासून काजळ तयार केलं जातं. (Homemade waterproof kajal by using only 3 ingredients)
घरच्याघरी काजळ तयार करण्याची पद्धत
काजळ तयार करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आपण जी पद्धत पाहणार आहोत, त्यासाठी आपल्याला ओवा, बदाम आणि साजूक तूप लागणार आहे.
फक्त ताप आल्यावरच नाही, तर तब्येतीच्या 'या' ४ तक्रारी असतील तरी आंघोळ करणं टाळा
सगळ्यात आधी तर एक कापूस घ्या. तो कापसू थोडा पसरवून घ्या आणि त्यात थोडा ओवा टाका. आता कापूस त्या ओव्यावरून गुंडाळून घ्या आणि त्याची वात तयार करा.
आता एका दिव्यामध्ये किंवा पणतीमध्ये साजूक तूप घाला. काही जण मोहरीचं किंवा तिळाचं तेलही यासाठी वापरतात. त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये आपण तयार केलेली ओव्याची वात टाका आणि दिवा लावा.
दिव्याच्या आजुबाजूला दिव्यापेक्षा उंच असतील असे दोन ग्लास किंवा कप ठेवा आणि त्यावर स्टीलची किंवा तांब्याची ताटली टाका.
फक्त सेफ्टी पिन, सुई वापरून कंगवा स्वच्छ होत नाही, बघा कंगवा कसा आणि कधी स्वच्छ करावा
दिवा पेटविल्यानंतर चिमट्यात पकडून एकेक बदाम दिव्यावर धरा. बदाम जळेल आणि त्यातून जो धूर म्हणजेच काजळी तयार होईल ती ताटलीवर जमायला लागेल. ३ ते ४ बदामांचं अशा पद्धतीने काजळ करा.
यानंतर थंड झाल्यावर ताटली सुलटी करा. कागदाने किंवा टोकदार वस्तूने त्याच्यावरची काळजी काढून घ्या. त्या काजळीमध्ये तुपाचे थेंब टाका आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्या. तुमचं होममेड, वॉटरप्रुफ आणि एकदम डार्क काळ्या रंगाचं काजळ झालं तयार...