सुंदर केस (Hair Care Tips) कोणाला नाही आवडत. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला केसांची निगा राखण्यास वेळ मिळत नाही. केमिकल उत्पादनांमुळे केस आणखी खराब होतात. ज्यामुळे हेअर फॉल आणि पांढऱ्या केसांची समस्या वाढतात. मुख्य म्हणजे हिवाळ्यात केस गळतीची समस्या वाढते. केसांची निगा राखताना आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. खोबरेल तेलातील गुणधर्म केसांच्या वाढीस मदत करतात.
पण फक्त खोबरेल तेलाचा (Coconut Oil) वापर न करता आपण त्यात कलौंजी बियांचा (Kalonji Seeds) वापर करू शकता. खोबरेल तेलामुळे केसांना पोषण मिळते, तर कलौंजी बियांमुळे केसांना नवीन जीवन मिळते. केसांवर खोबरेल तेल आणि कलौंजी बियांचा वापर कसा करावा?(How To Make Kalonji Or Black Seed Oil For Hair Growth).
अशा पद्धतीने तयार करा अँटी हेअर फॉल ऑइल
सर्वप्रथम, केसांच्या लांबीनुसार एका वाटीमध्ये खोबरेल तेल घ्या. त्यात कलौंजी बिया घालून वाटी गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर गॅस ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. नंतर तेल गाळून घ्या, व एका हवाबंद डब्यात तेल स्टोर करून ठेवा.
लिंबू पिळून साल फेकून देता? घ्या खास फेसपॅकची कृती, चेहऱ्यावरचे सगळे डाग होतील गायब
तेल लावण्यापूर्वी केस विंचरून घ्या, व थेट टाळूवर तेल लावा. ५ ते १० मिनिटांसाठी बोटाने स्काल्पवर मालिश करा. नंतर ३ ते ४ तासानंतर केस शाम्पूने धुवा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
केसांवर खोबरेल तेल लावण्याचे फायदे
फार पूर्वीपासून आपण केसांवर खोबरेल तेलाचा वापर करत आलो आहे. केसांच्या उत्तम वाढीसाठी खोबरेल तेल मदत करते. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-फंगल घटक असतात. ज्यामुळे केसांमधील कोंडा यासह पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळते.
दुधात ५ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, नकोसे केस गायब - चेहऱ्यावर येईल नवे तेज..
केसांसाठी कलौंजी बियांचे फायदे
केसांसाठी कलौंजी बिया फायदेशीर ठरतात. त्यात केसांसाठी लाभदायक ठरणारे फॅटी ऍसिड असतात.जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. यासह त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे कोंडा दूर तर होतोच, शिवाय टाळूवरील ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत करतात.