Join us  

हळदीकुंकू कार्यक्रमात सुंदर दिसायचंय? मेकअप करण्यापुर्वी 'हा' उपाय करा- चेहऱ्यावर येईल खूप तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 1:13 PM

Beauty Tips For Sankrant Special Look: हळदीकुंकू कार्यक्रमासाठी तयार होण्यापुर्वी फक्त १० ते १५ मिनिटांचा वेळ स्वस्त:साठी काढा आणि हा सोपा उपाय करा..

ठळक मुद्देत्वचा कोरडी पडण्याचा त्रास हिवाळ्यात अनेकांना होतोच. त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 

संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी छान तयार होऊन आपण नातलगांचे किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींचे तिळ-गूळ घ्यायला जातो. बऱ्याचजणी संक्रांतीच्या दिवशी हळदी- कुंकू कार्यक्रमही करतात. म्हणूनच यादिवशी आपण थोडं खास- स्पेशल दिसावं, अशी बहुतांश महिलांची अपेक्षा असतेच. म्हणूनच हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही सणावाराला, लग्नकार्यासाठी तयार होण्यापुर्वी चेहऱ्याला एक खास फेस मास्क लावा (what to do before applying make up). हा फेसमास्क लावल्याने त्वचा नितळ, सुंदर दिसेल. शिवाय मेकअपदेखील चेहऱ्यावर खूप छान पद्धतीने बसेल (How to look young and beautiful). कोरफडीचा वापर करून हा फेसमास्क (aloevera face mask) कसा तयार करायचा, ते पाहूया...(How to make korean face mask for glowing skin)

 

चेहऱ्यासाठी फेसमास्क कसा तयार करायचा?

कोरफडीचा गर वापरून चेहऱ्यासाठी फेसपॅक कसा तयार करायचा, याविषयीचा व्हिडिओ beauty.and.diy06 या पेजवर शेअर करण्यात आला आहे. korean face mask म्हणून देखील हा उपाय ओळखला जातो.

महिनोंमहिने टिकणारं आवळ्याचं चटपटीत लोणचं- जेवणात येईल रंगत न्यारी, रेसिपी अगदी सोपी

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफडीचा गर, तांदळाचं पीठ आणि मध असं साहित्य लागणार आहे.

सगळ्यात आधी तर कोरफडीचा ताजा गर काढून त्याची चांगली पेस्ट करून घ्या.

यानंतर त्या पेस्टमध्ये २ टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि १ टीस्पून मध टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि तो फेसमास्क हळूवारपणे मसाज करून चेहऱ्याला लावा. 

यानंतर साधारण १० ते १२ मिनिटांनी फेसमास्क अर्धवट सुकला की हाताने तो हळूवारपणे चोळून काढा.

नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा. यानंतर मग मेकअप करा.

 

चेहऱ्याला ॲलोव्हेरा फेसपॅक लावण्याचे फायदे

हा उपाय केल्याने त्वचेचे स्क्रबिंग होते आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.

भारतातल्या सुंदर पारंपरिक ७ काळ्या साड्या, संक्रांतीला एक तरी आपल्याकडे हवीच.. पाहा फोटो

चेहऱ्याचं टॅनिंगदेखील कमी होतं. त्यामुळे चेहरा स्वच्छ, नितळ आणि उजळ होतो.

कोरफडीच्या गरामुळे चेहरा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्वचा कोरडी पडण्याचा त्रास हिवाळ्यात अनेकांना होतोच. त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीमकर संक्रांती