Lokmat Sakhi >Beauty > ओठ काळवंडले आणि भेगाही पडल्या २ उपाय, भेगा गायब आणि ओठ होतील मऊ- गुलाबी 

ओठ काळवंडले आणि भेगाही पडल्या २ उपाय, भेगा गायब आणि ओठ होतील मऊ- गुलाबी 

Tips For Soft And Pink Lips: ओठ काळे झाले असतील आणि ड्राय पडले असतील तर हे काही उपाय करून बघा. ओठ पुन्हा मऊ आणि गुलाबी होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2023 09:23 AM2023-09-02T09:23:36+5:302023-09-02T09:25:02+5:30

Tips For Soft And Pink Lips: ओठ काळे झाले असतील आणि ड्राय पडले असतील तर हे काही उपाय करून बघा. ओठ पुन्हा मऊ आणि गुलाबी होतील.

How to make lips pink and healthy? Home remedies for dry lips, tips for soft and pink lips  | ओठ काळवंडले आणि भेगाही पडल्या २ उपाय, भेगा गायब आणि ओठ होतील मऊ- गुलाबी 

ओठ काळवंडले आणि भेगाही पडल्या २ उपाय, भेगा गायब आणि ओठ होतील मऊ- गुलाबी 

Highlightsआपली त्वचा टॅन होऊन काळवंडली असेल तर आपण त्वचेवर स्क्रब करतो. आता हाच उपाय आपल्याला ओठांवर करायचा आहे.

हा अनुभव आपण नेहमीच घेतो. त्वचेची काळजी घेताना ओठांकडे मात्र दुर्लक्ष होते. त्यामुळे मग ओठ काळे पडतात. त्यांच्यावर उभ्या भेगा दिसू लागतात (Home remedies for dry lips). लिपस्टिक लावली तरी मग ती एकसारखी दिसत नाही. ओठ काळे पडण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे पाणी कमी पिणे. डिहायड्रेशन होऊन ओठ कोरडे दिसू लागतात. दुसरं म्हणजे चांगल्या दर्जाची लिपस्टिक, लीपग्लॉस, लीप लायनर वापरले नाही, तर त्याचाही परिणाम ओठांवर होतो आणि ओठ काळवंडतात. म्हणूनच काळवंडलेल्या, भेगाळलेल्या ओठांना पुन्हा गुलाबी, मऊ करायचं असेल तर पुढील २ उपाय करून बघा. (tips for soft and pink lips)

 

काळवंडलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय 
१. ओठांना करा स्क्रब

आपली त्वचा टॅन होऊन काळवंडली असेल तर आपण त्वचेवर स्क्रब करतो. आता हाच उपाय आपल्याला ओठांवर करायचा आहे. ओठांना स्क्रब केल्यामुळे त्यांचे काळवंडलेपण तर कमी होतंच शिवाय त्यांच्यावरची डेड स्किन निघून जाते आणि ओठ मऊ होतात.

खाल्लंय कधी कांद्याचं लोणचं? चटकदार कांदा- मिरची लोणच्याची ही बघा चटपटीत रेसिपी 

ओठांना स्क्रब करण्यासाठी लिंबाचा रस, मध आणि साखर यांचं मिश्रण वापरा. हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने चोळा. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करावा. यामुळे ओठांमधलं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं आणि ओठ गुलाबी दिसू लागतात. 

 

२. साय आणि चणाडाळीचं मिश्रणही ओठांसाठी उत्तम स्क्रब आहे. यासाठी साय आणि चणा डाळ एकत्र करून कालवून घ्या. हे मिश्रण खूप पातळ नसावं.

स्टार किड्स आणि त्यांची महागडी फॅशन! बघा कोणत्या स्टार्सची मुलं वापरतात सर्वाधिक महागड्या वस्तू

या मिश्रणाने ओठांना मसाज करा. त्यानंतर ओठ थंड पाण्याने धुवून टाका आणि साजूक तूप लावून ओठांना मसाज करा. हा उपायही आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा. 
 

Web Title: How to make lips pink and healthy? Home remedies for dry lips, tips for soft and pink lips 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.