Join us  

फक्त २ चमचे गुलाबपाणी वापरा आणि बनवा मेकअप सेटिंग स्प्रे, चेहऱ्याला केमिकल न लावता दिसा सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 6:35 PM

How To Make Makeup Setting Spray With Rose Water At Home : Refreshing Makeup Setting Rosewater Spray : दिवाळीत मेकअप केल्यावर वापरा हा खास घरगुती मेकअप सेटिंग स्प्रे...

एखादा खास प्रसंग, सणवार म्हटलं की मेकअप आलाच. सुंदर दिसण्यासाठी आपण मेकअप करतोच. आपल्याला सूट होईल असा, आकर्षक, सुंदर मेकअप करण्यासाठी बराच वेळ जातो. सुंदर दिसण्यासाठी आपण तासंतास मेकअप करण्यात घालवतो खरे, पण काहीवेळा काही कारणांमुळे आपला मेकअप लगेच खराब होतो किंवा पुसला जातो. ऊष्णता, गरमी, घाम यांसारख्या अनेक कारणांमुळे आपला मेकअप खराब होतो, अशावेळी ऐन खास प्रसंगी आपला लूक तर खराब होतोच शिवाय मेकअप करण्यासाठीचा वेळ आणि मेहेनत देखील वाया जाते. मेकअप खराब होऊ नये म्हणून आपण शक्यतो मेकअप सेटिंग स्प्रेचा वापर करतो(How To Make Makeup Setting Spray With Rose Water At Home).

आपला संपूर्ण मेकअप झाल्यावर या मेकअपवर एका विशिष्ट प्रकारचे लिक्विड सोल्युशन आपण स्प्रे करतो. ज्यामुळे आपला मेकअप पुढेच काही तास खराब न होता आहे तसाच सेट होऊन चेहऱ्यावर राहतो. हा मेकअप सेटिंग स्प्रे आपण वेगवेगळ्या ब्रॅंड्सचा विकत घेतो. परंतु अशा विकतच्या सेटिंग स्प्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक केमिकल असतात. असे केमिकल्सयुक्त स्प्रे वापरुन आपली त्वचा खराब होऊ शकते किंवा त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच आपण असा केमिकल्सयुक्त सेटिंग स्प्रे वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक पदार्थ वापरुन घरच्या घरीच केमिकल्स फ्री मेकअप सेटिंग स्प्रे तयार करु शकतो. होममेड सेटिंग स्प्रे तयार करण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात(Refreshing Makeup Setting Rosewater Spray).

१. होममेड केमिकल्स फ्री मेकअप सेटिंग स्प्रे करण्याची पद्धत १ :- 

साहित्य :- 

१. गुलाब पाणी - २ टेबलस्पून २. ग्लिसरीन - १ टेबलस्पून ३. डिस्टिल वॉटर - १ कप ४. स्प्रे बाटली - १ बाटली 

कृती :- 

१. एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्रित मिसळून घ्यावे. २. त्यानंतर या मिश्रणात डिस्टिल वॉटर घालून ते एकत्रित मिक्स करुन घ्यावे. ३. आता हे तयार मिश्रण एका स्वच्छ धुतलेल्या स्प्रे बॉटलमध्ये भरुन स्टोअर करून ठेवावे. ४. संपूर्ण मेकअप झाल्यावर हा होममेड मेकअप सेटिंग स्प्रे चेहऱ्यावर हलकेच स्प्रे करून घ्यावा. यात असणारे गुलाबपाणी आणि ग्लिसरीन यामुळे आपले स्किन पोर्स टाईट होतात. ज्यामुळे आपला मेकअप पुढचे काही तास चेहऱ्यावर व्यवस्थित सेट होऊन राहतो.    

फक्त १ चमचा तूप आणि ४ थेंब ऑलिव्ह ऑइल-केसांचं गळणं कायमचं बंद करणारा भन्नाट उपाय...

  २. होममेड केमिकल्स फ्री मेकअप सेटिंग स्प्रे करण्याची पद्धत २ :- 

साहित्य :- 

१. गुलाब पाणी - २ टेबलस्पून २. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून ३. डिस्टिल वॉटर - १/२ कप ४. इसेंन्शियल ऑईल - २ ते ३ थेंब ५. स्प्रे बॉटल - १ बाटली

 कृती :- 

१. एका काचेच्या बाऊलमध्ये गुलाबपाणी आणि एलोवेरा जेल मिसळून ते चांगले एकजीव करून घ्यावे. २. आता या मिश्रणात डिस्टिल वॉटर आणि इसेंन्शियल ऑईल घालून सगळे घटक मिसळून एकजीव करून घ्यावे. ३. आता हे सगळे मिश्रण एकत्रित करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन स्टोअर करून ठेवावे.   ४. संपूर्ण मेकअप झाल्यावर हा होममेड मेकअप सेटिंग स्प्रे चेहऱ्यावर हलकेच स्प्रे करून घ्यावा. यातील एलोवेरा जेलमुळे त्वचेला थंडावा मिळून मेकअप चांगला सेट होतो.

'हे' ३ पदार्थ खा आणि स्किन प्रॉब्लेम्स कायमचे विसरा, ऋजुता दिवेकर यांचा खास सल्ला...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स