Join us  

केमिकल न वापरता हातावरची मेहंदी रंगेल लाल, करा फक्त ४ गोष्टी.. मेहंदी रंग लायेगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 11:39 PM

How To Make Mehendi Darker And Long Lasting मेहेंदीचा रंग गडद करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, मेहेंदीचा रंग चढेल, हात दिसतील सुंदर - सुरेख

लग्न असो किंवा समारंभ महिला हातांवर मेहेंदी आवर्जुन काढतात. महिल्यांच्या श्रृंगारामध्ये मेहंदीला खूप महत्व आहे. मेहेंदी हातावर रंगली की, खूप सुरेख दिसतात. अनेक महिलांना विविध मेहेंदी डिझाईन येतात. हे डिझाईन हातावर खुलून दिसतात. असे म्हणतात, जेवढा मेहंदीचा रंग चढतो, तेवढं तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर प्रेम आहे.

परंतु अनेक वेळा मेहंदीचा रंग फिका पडतो. अशा परिस्थितीत काय करावे हे सुचत नाही. मेहेंदीवर जर गडद लाल रंग चढावा असे वाटत असेल, तर या टिप्स फॉलो करा. या उपायांमुळे मेहेंदीचा रंग तर गडद होईलच, यासह ती दीर्घकाळ टिकेल. चला तर मग मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे हे पाहूयात(Tips To Make Mehendi Darker And Long Lasting).

या उपायांमुळे मेहेंदीचा रंग गडद होईल

निलगिरीचे तेल

निलगिरीचे तेल आपण कमीच वापरले असेल, पण या तेलामुळे मेहेंदीचा रंग अधिक गडद होईल. यासाठी मेहेंदी सुकल्यानंतर पाण्याविना काढा, त्यानंतर निलगिरीचे तेल हातांवर लावा. व सुमारे ३० मिनिटांनी हात धुवा.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतो, ब्लॅकहेड्स वाढलेत? ३ उपाय, चेहरा दिसेल स्वच्छ-चमकदार

देशी तूप

देशी तुपामुळे मेहेंदीचा रंग अधिक खुलून दिसेल. आजीच्या बटव्यातील हा उपाय, फार पूर्वीपासून महिलावर्ग वापरत आले आहेत. यासाठी मेहेंदी सुकल्यावर ती न धुता काढा. आता दोन्ही हातांना देशी तूप लावा. थोड्या वेळानंतर हात धुवा, याने मेहेंदीचा रंग गडद होईल.

बाम

मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी बाम लावण्याचा ट्रेण्ड अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मेहेंदी सुकल्यानंतर ती काढा आणि हातावर बाम चोळा. हात धुण्याआधी डोळे, तोंड आणि नाकाला स्पर्श न करण्याची काळजी घ्या. कारण बाममुळे झोंबू शकते.

पंख्यावर धुळीचे थर, काळाकुट्ट झालाय? २ घरगुती सोपे उपाय, डाग गायब-पंखे दिसतील चकाचक

लवंग

लवंगच्या मदतीने मेहेंदीचा रंग आणखीनच गडद होतो. यासाठी लवंग तव्यावर भाजून घ्या, मेहेंदी काढल्यानंतर लवंग भाजलेल्या तव्यावर हात ठेवा. त्यातून निघणारा धूर हातावर शेकून घ्या. यानंतर आपण खोबरेल तेलही हातवार लावू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी