Join us  

केसांची वाढच होत नाही? खोबरेल तेलात मिसळा फक्त २ गोष्टी; गुडघ्यांपर्यंत वाढतील केस - दिसतील दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 4:37 PM

How to make my hair grow thicker and longer quickly by using Coconut Oil : सुंदर आणि मजबूत केसांसाठी खोबरेल तेलाचा सोपा उपाय करून पाहा

केसांच्या (Hair loss) योग्य वाढीसाठी त्यांची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे (Hair Care Tips). आजकाल प्रदूषण, बिघडलेली जीवनशैली आणि केमिकल रसायनयुक्त उत्पादनांमुळे केस आणखीन खराब आणि कमकुवत होतात (Beauty Tips). बऱ्याचदा केसांची वाढही खुंटते. काहींचे केस वाढत नाही. एकाच लांबीवर अडकते (Coconut oil). त्याहून केसांची वाढही होत नाही.

केस गळण्यामागे आणि वाढ न होण्यामध्ये बरीच कारणं आहेत (Hair Fall). केसांच्या वाढीसाठी आपण बऱ्याच गोष्टी करून पाहतो. पण तरीही हवा रिझल्ट दिसून येत नाही. जर केसांची वाढ खुंटली असेल आणि फार गळत असतील तर, खोबरेल तेलामध्ये काही गोष्टी मिसळून हेअर मास्क तयार करून पाहा. यामुळे केस सुंदर आणि घनदाट होतील(How to make my hair grow thicker and longer quickly by using Coconut Oil).

केसांच्या वाढीसाठी होममेड हेअर मास्क

- केसांसाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते. यामुळे केसांची योग्य वाढ होते, शिवाय अनेक समस्याही दूर होतात. आपण लहानपाणीपासून केसांना खोबरेल तेल लावलं आहे. पण फक्त खोबरेल तेल पुरेसं नाही. त्यात आपण दूध आणि केळीही मिक्स करू शकता.

- यासाठी एका वाटीमध्ये खोबरेल तेल घ्या. त्यात २- ३ चमचे दूध मिसळा. नंतर त्यात एक पिकलेला केळ मॅश करून मिक्स करा. या तिन्ही गोष्टी मिसळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. १० मिनिटानंतर केसांना तयार पेस्ट लावा. आणि केस बांधून ठेवा.

चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..

- २ तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्यानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आपण या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून १ वेळा वापरू शकता.

नारळ तेल - केळ्याचा हेअर मास्क लावण्याचे फायदे

- हा तयार हेअर मास्क केसांना लावल्याने केसांमधील कोरडेपणा कमी होतो.

- पिकलेलं केळ केसांना पोषण आणि आर्द्रता प्रदान करते. ज्यामुळे केस मऊ आणि सुंदर दिसतात.

किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

- या हर्बल हेअर मास्कमुळे केस गळण्याची समस्या कमी होते.

- केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर संयुगे असतात. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होऊ शकते. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स