Join us  

कंगवा फिरवताच घरभर केस पसरतात? ३ घरगुती उपाय; केस काळे - दाट होण्याचं रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 6:18 PM

How to make my hair naturally thicker and fuller without chemical products : केसांची वाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे; त्याची नैसर्गिक पद्धतीनेच निगा राखा

केसांची जलद वाढ व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते (Hair care Tips). पण केसांची वाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही लोकं दावे करतात, आठवडा किंवा १५ दिवसात केसांची वाढ होईल (Beauty Tips). पण तसं अशक्य आहे. काही जण केसांच्या वाढीसाठी  ब्यूटी उत्पादनांचा वापर करतात. ज्यामध्ये केमिकल रासायनांचा वापर होतो. यामुळे केसांच्या समस्या अधिक वाढतात.

केस पांढरे होणे, केसात कोंडा, केस गळणे या समस्या सोडवण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. जर केसांची योग्य निगा राखायची असेल तर, काही घरगुती उत्पादनांचा वापर करून पाहा. यामुळे केसांच्या समस्या सुटतील. शिवाय केसांची निगा राखताना कोणत्या चुका टाळायला हव्या? पाहा(3 Natural Methods to Increase Thickness and Volume of Your Hairs).

केसांच्या वाढीस चालना देणारे घरगुती उपाय

खोबरेल तेल

 

केसांसाठी खोबरेल तेल म्हणजे वरदान. खोबरेल तेलात प्रथिनेचे प्रमाण जास्त असते. जयामुळे केसांच्या मुळं मजबूत होतात. केसातून कोंडा घालवण्यापासून ते पोषण देण्यापर्यंत  खोबरेल तेल केसांसाठी अधिक फायदेशीर ठरते. यासाठी खोबरेल तेल कोमट करून सकल्पवर तेल लावून मसाज करा. 

सायंकाळी भूक लागली की वाट्टेल ते खाता? ‘या’ ८ पैकी १ तरी पदा‌र्थ खा, प्रोटीन मिळेल भरपूर - वजनही घटेल झरझर

मेथी दाणे

केसांचे आरोग्य राखण्यासाठी मेथी दाणे मदत करते. मेथी दाण्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन - सी, प्रोटीन, हे स्कॅल्प हेल्दी ठेवण्यात मदत करते. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात. आपण मेथी दाण्यांचा हेअर  मास्कही तयार करू शकता.

एलोवेरा जेल

केसांची निगा राखण्यासाठी कोरफडीचा समावेश केल्याने हायड्रेशन वाढू शकते. अनेकांच्या टाळूवर सतत खाज सुटते. यासह डॅण्डरफच्या समस्येनेही बरेच जण त्रस्त  आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करा. 

केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

संतुलित आहार

केसांच्या वाढीसाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे युक्त आहार घ्या. यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतील.

तणाव कमी

केस गळण्याचे मुख्य कारण तणाव आहे. योग, ध्यान इत्यादीद्वारे तणाव कमी करा.

भिजवलेली कणिक किती तासांनंतर वापरु नये? १ चूक आणि भिजवलेली कणिक पडते काळी..

गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा

गरम पाण्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा.

रासायनिक उत्पादने टाळा

केसांवर रासायनिक उत्पादनांचा वापर शक्य तितका कमी करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स