केस पांढरे (White Hairs) होणं हे खूपच कॉमन आहे. पण जेव्हा कमी वयातच केस पांढरे होऊ लागतात तेव्हा ही समस्या अधिक वाढते. पुरूष असो किंवा महिला कोणाचेही केस पांढरे झाले तर त्यांच्या सौंदर्यावर याचा परिणाम होतो आणि आपण म्हातारे झालो असे वाटून आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पिकलेले केस काळे करण्यासाठी लोक केमिकल्सयुक्त डायचा वापर करतात. (How To Make Natural Hair Dye For Black Hairs)
ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. (Hair Care Tips) कोणत्याही केमिकल्सचा वापर न करतात केस काळे करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी नॅच्युरल डाय बनवू शकता ज्यामुळे केस वेळेआधीच पांढरे होणं टाळता येतं. केस काळे करण्यासाठी नॅच्युरल हेअर डायचा वापर करू शकता. (How To Colur Your Hairs)
थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट
केस पांढरे का होतात? (Causes Of Grey Hairs)
काहीजणांना जास्त स्ट्रेस घ्यायची सवय असते जास्त स्ट्रेस घेतल्याने ऑटो इम्यून आजार, थायरॉईड, व्हिटामीन्ससची कमतरता, युव्ही किरणं आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानामुळे केस पांढरे होतात. ज्यामुळे केसांच्या रंगद्रव्य पेशींवर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे मेलेनिन कमीत कमी प्रमाणात तयार होते ज्यामुळे केस पिकू लागतात.
नॅच्युरल डाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Ingredients For Natural Hair Dye)
१ कप पाणी, २ चमचे चहा पावडर, २० ते २५ हाराची फुलं, हारासाठी वापरली जाणारी पानं, एक पाकीट कॉफी, लोखंडाची एक कढई घ्या.
वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा
काळ्या केसांसाठी नॅच्युरल हेअर डाय कसा करायचा? (How To Make Natural Hair dye)
सलूनमध्ये केमिकल्सयुक्त प्रोडक्टस् तुम्हाला वापरायचे नसतील तर घरीच हेअर डाय बनवू शकतात. यासाठी एका लोखंडाच्या कढईत २ कप पाणी आणि २ चमचे चहा पावडर घाला. हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्या. जेव्हा पाणी एक कप होईल तेव्हा गॅस बंद करा. नंतर एका मिक्सर जारमध्ये चाय पावडर घालून ठेवा. नंतर २० ते २५ फुलं आणि पानं घालून पुन्हा पाहून शिजवून घ्या.
या संपूर्ण मिश्रणाची बारीक पेस्ट बनवून घ्या आणि एका बाऊलमध्ये काढा. यात एक पाकीट कॉफी घाला. तयार आहे हेअर डाय. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा पॅक लोखंडाच्या कढईत ३ ते ४ तास ठेवू शकता. त्यानंतर या हेअर पॅकचा वापर करा. केस काळेभोर होण्यास मदत होईल.