Join us  

घरगुती हेअर डाय बनविण्याची आजीबाईंची खास पद्धत- बघा पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 11:16 AM

How To Make Natural Hair Dye At Home: पांढरे केस काळे करण्यासाठी कोणतेही केमिकल्सचे हेअर कलर, किंवा हेअर डाय लावावे वाटत नसतील, तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (best homemade chemical free hair dye for gray hair)

ठळक मुद्देहा उपाय केल्याने केस तर काळे होतीलच, पण त्यात कोणतंही केमिकल नसल्याने केसांचं नुकसान होणार नाही, हे नक्की.

हल्ली केस पांढरे होण्याचा आणि वय वाढण्याचा काहीही संबंध राहिलेला नाही. अगदी शाळकरी मुलांच्याही डोक्यात पांढरे केस डोकवायला सुरुवात होते. एवढ्या कमी वयापासूनच केसांवर केमिकल्स असणाऱ्या डाय किंवा हेअर कलरचा मारा करायला नकोसे वाटते. म्हणूनच आता हा एक नैसर्गिक उपाय पाहा (best homemade hair dye for gray hair). यामध्ये घरगुती साहित्य वापरून केसांसाठी घरच्याघरी हेअर डाय कसा तयार करायचा, याची माहिती सांगितली आहे (natural hair dye using turmeric and haldi). हा उपाय केल्याने केस तर काळे होतीलच, पण त्यात कोणतंही केमिकल नसल्याने केसांचं नुकसान होणार नाही, हे नक्की. (How to make natural hair dye at home)

केसांसाठी घरच्याघरी हेअर कलर तयार करण्याची पद्धत

 घरगुती पदार्थ वापरून केसांसाठी हेअर कलर कसा तयार करायचा, याची माहिती 'आपली आजी' या युट्यूब चॅलनवर शेअर करण्यात आली आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद, मोहरीचं तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागणार आहेत.

खऱ्याखुऱ्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ६ मेकअप टिप्स, दिसाल जास्त सुंदर- आकर्षक

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एक लोखंडी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये १ वाटी मोहरीचं तेल टाका.

मोहरीचं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये पाऊण वाटी हळद टाका. आता हे सगळं मिश्रण हलवत राहा.

 

१० ते १५ मिनिटांनी कढईतलं तेलाचं आणि हळदीचं मिश्रण काळपट रंंगाचं झालेलं दिसेल. तेलाला जेव्हा गडद काळा रंग येईल, तेव्हा गॅस बंद करा.

थंड झाल्यानंतर हे मिश्रण एखाद्या वाटीमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल टाका.

काही मिनिटांतच पिंपल्स दबून जातील, स्वयंपाक घरातले ३ पदार्थ वापरून करा आयुर्वेदिक उपाय

आता हा घरगुती हेअर डाय तुमच्या केसांना लावा आणि २ ते ३ तासांनी केस धुवून टाका. 

हा उपाय महिन्यातून दोन ते तीन वेळा केला तरी चालेल. यामुळे केसांना काळा रंग येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी