Join us  

केसांना शाम्पू व कंडिशनर दोन्हींचे पोषण देणारा आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 7:21 PM

How To Make Homemade Shampoo & Conditioner The Easy Way : आता केसांना शाम्पू व कंडिशनर दोन्ही वेगवेगळे लावण्याची गरज नाही घरीच बनवा हा सिक्रेट उपाय...

केसांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांची निगा राखणं देखील तितकंच महत्वाचं असत. केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण त्यांची काळजी घेतो. केसांना वेळच्या वेळी तेलाने मसाज करणे, शाम्पूने केस स्वच्छ धुवून त्यांना कंडिशनिंग करणे, अशी बेसिक काळजी तर आपण घेतोच. केस शाम्पूने स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना कंडिशनिंग करणे देखील तितकेच महत्वाचे असते. अनेकदा तज्ज्ञांकडूनही असा सल्ला दिला जातो की, केस हेल्दी ठेवण्यासाठी आणि डॅमेजपासून वाचवण्यासाठी कंडिशनर फार उपयुक्त ठरते. त्यामुळे शाम्पूनंतर (Homemade Shampoo) केसांसाठी योग्य ते कंडिशनर लावले पाहिजे(How to Make Natural Homemade Shampoo & Conditioner).

केसांच्या अनेक समस्या कमी होऊन केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कंडिशनर (2 in 1 shampoo and conditioner, Homemade products) लावणे गरजेचे असते. कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते. आपण केसांसाठी बाजारांत मिळणारे महागडे कंडिशनर आणि शाम्पू  विकत घेतो. परंतु, या शाम्पू - कंडिशनरमध्ये (Homemade Herbal Shampoo & Conditioner Recipe) खूप जास्त प्रमाणात केमिकल्स असतात. केसांच्या आरोग्यासाठी असे केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स खूप घातक असतात. हे केमिकल्स केसांना रुक्ष व निर्जीव बनवतात. त्यामुळे काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपण घरच्या घरीच शॅम्पू व कंडिशनर बनवू शकतो(Shampoo & Conditioner Recipes You Can Make at Home).

साहित्य :- 

१. रिठा - १५० ग्रॅम २. डिंक - १० ग्रॅम ३. मेथी - १ टेबलस्पून ४. अळशी - १ टेबलस्पून ५. तांदुळाचे पाणी - २ कप 

सोप्या ४ स्टेप्समध्ये स्वस्तात मस्त गोल्ड फेशियल करा घरच्या घरीच, चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा ग्लो... 

आता फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरी करा बॉडी पॉलिशिंग, पार्लरमध्ये जाऊन मिळणार नाही इतका ग्लो!

कृती :- 

१. सगळ्यांत आधी रिठा १० मिनिटे गरम पाण्यांत भिजवून ठेवा. २. मेथी व अळशी दोन्ही एकत्रित मिक्स करुन पाण्यांत तासभर भिजत ठेवा. ३. डिंकाचे लहान तुकडे करून तो रात्रभर किंवा किमान २ ते ३ तास भिजत ठेवावा. 

४. एका भांड्यात भिजवलेली मेथी व अळशी पाण्यासहीत ओतून घ्यावे. त्यानंतर त्यात भिजवून घेतलेला डिंक, रिठा घालावे. आता हे सगळे मिश्रण मंद आचेवर उकळवून घ्यावे.  ५. सगळ्यात शेवटी या मिश्रणात तांदुळाचे पाणी घालून सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. ६. गॅस बंद करून हे मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. गार झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. आता हे मिश्रण एका हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. 

या मिश्रणाचा वापर केल्याने केसांना शाम्पू आणि कंडिशनर असे दोन्ही वेगवेगळे लावावे लागणार नाहीत. या लिक्विडने केस धुतल्यास शाम्पू व कंडिशनर या दोन्हीचेपोषण केसांना मिळेल. एकदा बनवलेले हे मिश्रण पुढील फक्त ३ ते ४ दिवसच वापरावे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी