प्रत्येक मुलीला आपले केस लांब, दाट असावेत असं वाटतं. (Hair Care Tips) पण अनेकांच्या केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. अशा स्थितीत केमिकल्सयुक्त हेअर केअर उत्पादनांचा केल्यास केस गळणं, केस तुटणं यांसारख्या समस्या उद्भवतात. काहीजण केसांच्या समस्या टाळण्यासाठी शॅम्पूचा वापर करतात. केसांची वाढ योग्य पद्धतीनं होण्यासाठी तुम्हाला शॅम्पू बनवण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. केसांची वाढ चांगली होण्यासाठी आणि केसांना लांब ठेवण्यासाठी मदत होईल. ज्यामुळे केसांची वेणी कंबरेपर्यंत वाढेल. तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. (How To Make Natural Shampoo For Rapid Hair Growth At Home)
घरी बनवलेला शॅम्पू लावण्याचे फायदे
केमिकल्सयुक्त शॅम्पूमध्ये सोडीयम लॉरिअल सल्फेट आणि पॅराबेन्स अशी तत्व असतात. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते आणि पांढरे केस वाढतात.
घरगुती शॅम्पू बनवण्यासाठी काय लागते?
1) तांदूळ- १ कप
२) मेथीचे दाणे - २ चमचे
३) रिठा - १ कप
भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी
४) पाणी - १ ग्लास
५) फ्लेक्स सिड्स - चमचा
सगळ्यात आधी एक कप तांदूळ घ्या त्यात २ ग्लास पाणी घालून रात्रभर भिजवण्याासाठी ठेवा. नंतर एक बाऊल घ्या. त्यात १ कप रिठा, २ चमचा मेथीचे दाणे, २ चमचे फ्लेक्स सिड्स आणि २ ग्लास पाणी घालून भिजवण्यासाठी ठेवा.
लिंबाच्या साली फेकू नका, 'या' पद्धतीनं वापरा; घरात एकही डास-झुरळ दिसणार नाही
दुसऱ्या दिवशी तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या नंतर गाळून पाणी वेगळं करा. मग एक पॅन घ्या त्यात तांदूळाचं पाणी, रिठा, मेथी आणि फ्लेक्स सिड्स घालून १५ ते २० मिनिटं उकळवून घ्या. सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घालून पेस्ट तयार करून घ्या. नंतर मिक्सरमधून रिठाच्या बीया घालून वाटून घ्या. रिठा उकळून पाण्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. या उपायामुळे केसांची वाढ चांगली होईल.