Join us  

पिंपल्स, काळ्या डागांनी चेहरा खराब झालाय? ३ वस्तूंपासून बनवा खास साबण; त्वचा दिसेल ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 5:54 PM

How To Make Neem Soap at home : कडुनिंबाच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि खनिजे असतात जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

कडुलिंबाची पानं एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणांनी समृद्ध असतात. (Skin Care Tips) सौंदर्य वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो.  याशिवाय कडुलिंबाचा साबण वाढत्या वयाची लक्षणं मंदावण्यास मदत करतो. कडूलिंबाचा साबण त्वचेवर कसा वापरता येईल समजून घेऊया. आजकाल त्वचेच्या समस्या अनेकांना उद्भवतात. (Neem For Skin)

या समस्या टाळण्यासाठी कडुलिंबाचा साबण घरच्याघरी तयार करता येतो.  या साबणाच्या वापरानं त्वचेतील डार्क स्पॉट्स, एलर्जी, संक्रमणाच्या समस्या दूर करण्यास मदत होईल. कडूलिंब त्वचेची आतून स्वच्छता करतो.  (How To Make Neem Soap) 

साहित्य

२ कप कडुलिंबाची पाने, 

ग्लिसरीन साबण, 

१/२ चमचे इसेंशियल ऑईल,

साबण तयार करण्याचा साचा.

कडुलिंबाचा साबण कसा बनवायचा?

कडुलिंबाचा साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम कडुलिंबाची पाने घ्या. मग ही पानं नीट धुवून स्वच्छ करा. यानंतर पाने मिक्सरमध्ये बारीक करून घट्ट पेस्ट तयार करा.  नंतर ग्लिसरीन साबण चाकूने बारीक चिरून घ्या. यानंतर, मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि चांगले वितळवा. 

नंतर कडुलिंबाच्या पेस्टमध्ये इसेंशियल ऑईलचे काही थेंब घाला. यानंतर चिमूटभर हळद पावडर घालून मिक्स करा. नंतर या सर्व गोष्टी नीट मिसळा.मग वितळलेल्या साबणामध्ये कडुलिंबाची पेस्ट घाला. मग तुम्ही ते एकदा मायक्रोवेव्हमध्ये थोडा वेळ वितळवा. यानंतर, हे मिश्रण साबणाच्या साच्यात घाला.  फ्रिजमध्ये 4-5 तास ठेवून सेट करा. आता तुमचा कडुलिंब साबण तयार आहे.

खूप कमी लोकांना याबाबत माहिती असते की कडुलिबांची पानं तुमच्या पचनक्रियेसाठी उत्तम ठरतात. यामुळे लिव्हरची कार्यप्रणाली सुधारते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रोज कडुलिंब चावून खाल्ल्यानं बॅक्टरियाज नष्ट होतात आणि पचनतंत्र सुधारण्यास मदत होते.

कडुलिंबातील एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करतात.  यामुळे रक्त शुद्ध करण्यास मदत होते  आणि तुमची त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ  होते. कडुलिंबाच्या काड्या चावल्यानं त्वचा शुद्ध होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेला आतून पोषण मिळतं.

कडुनिंबाच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि खनिजे असतात जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाचे तेल बहुतेकदा वृद्ध रुग्णांना सांधेदुखीच्या वेदना आणि वयाबरोबर येणार्‍या कोणत्याही वेदना कमी करण्यासाठी दिले जाते. कडुलिंबाच्या तेलानं नियमित मसाज केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी