Join us  

गुडघ्यापर्यंत लांबचलांब वाढतील केस; १ कांदा वापरून लावा खास हेअर सिरम; दाट केसांचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:04 AM

How to make onion hair serum : . कांद्याची पेस्ट तयार झाल्यानंतर गाळणी किंवा कापडानं पिळून कांद्याचा लगदा आणि रस वेगळा करा.

सर्वांच्याच स्वंयपाकघरात उपलब्ध असणारा कांदा त्वचा आणि केसांसाठीही तितकाच फायदेशीर ठरतो. केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. (How to grow hairs using onion) केसांच्या समस्या टाळण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं उपलब्ध आहेत. (Home remedies for hair Growth) गळणारे केस, पांढरे केस, कोरडे केस  यांसारख्या समस्याही कांद्याच्या वापरानं दूर होतात. कांदा तुम्ही सिरमच्या स्वरूपात वापरू शकता. केस वाढवण्यासाठी कांद्याचे सिरम फायदेशीर (Onion Serum) ठरते.

कांद्याचं सिरम बनवण्यासाठी  तुम्हाला ३ वस्तूंची आवश्यकता असेल. १ मध्यम आकाराचा कांदा, एक मोठा चमचा कॅस्टर ऑईल आणि २ मोठे चमचे नारळाचं तेल घ्या. सगळ्यात आधी कांदा लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर ब्लेंडरमध्ये घालून कांदा बारीक दळून घ्या. कांद्याची पेस्ट तयार झाल्यानंतर गाळणी किंवा कापडानं पिळून कांद्याचा लगदा आणि रस वेगळा करा. (How to make onion hair serum)

एका लहान भांड्यात नारळाचं तेल, कांद्याचा रस आणि कॅस्टर ऑईल मिसळून घ्या. तुम्ही सुगंधासाठी यात इसेंशियल ऑईल घालू शकता. हे मिश्रण बाटलीत भरून ठेवून द्या. तयार आहे होममेड हेअर सिरम. कांद्याच्या हेअर सिरममुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते. 

रोज तुटून केस विरळ झालेत? १ कांदा अन् ४ कडूलिंबाची पानं घ्या; ३० दिवसांत केसांची वाढ होईल

केसांवर कांदा लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कांदाची बारीक पेस्ट तयार करा. (Onion Juice)  कांदा किसून घ्या किंवा कांद्याचे काप मिक्सरमधून वाटून घ्या आणि केसांच्या मुळांना लावा. कमीत कमी १५ ते २० मिनिटांसाठी केसांना हे मिश्रण लावून ठेवा नंतर सौम्य शॅम्पूच्या मदतीनं केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा कांद्याचा रस केसांना लावल्यास चांगला परीणाम दिसून येईल.

फक्त १ मिनिटांत घरीच करा आईस वॉटर फेशियल; ब्लिच-फेशियलचा खर्च न करता मिळेल ग्लोईंग स्किन

कांद्यात  एंटी मायक्रोबियल आणि एंटी इंफ्लेमिटरी गुणधर्म असतात. जे स्काल्प संक्रमणाशी लढण्यास  मदत करतात.  यामुळे स्काल्प बॅक्टेरिया फ्री राहते आणि खाजेची समस्या उद्भवत नाही. केसांच्या विकासासाठी आणि निरोगी स्काल्पसाठी कांदा लावणं फायदेशीर ठरतं. 

कांद्याचे सिरम लावण्यसाठी सगळ्यात आधी केस दोन भागात विभाजित करा. तुमच्या बोटांनी किंवा ड्रॉपर वापरून थोड्या प्रमाणात सीरम थेट तुमच्या टाळूवर लावा. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी काही मिनिटे तुमच्या टाळूमध्ये सीरमची हळुवारपणे मालिश करा.

टाळूवर सीरम लावल्यानंतर, सीरम पसरवण्यासाठी कंगवा किंवा बोटांचा वापर करा. सर्वोत्तम परिणामांसाठी, सिरम तुमच्या टाळूवर आणि केसांवर किमान ३० मिनिटे किंवा रात्रभर सोडा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी