Lokmat Sakhi >Beauty > संत्री - लिंबाच्या साली फेकू नका, त्यापासून घरीच करा होममेड फेसवॉश, पैशांची बचत-स्किन दिसेल ग्लोइंग...

संत्री - लिंबाच्या साली फेकू नका, त्यापासून घरीच करा होममेड फेसवॉश, पैशांची बचत-स्किन दिसेल ग्लोइंग...

Homemade Facewash : Homemade Facewash For Daily Use : How To Make Orange & Lemon Peel Face Wash at Home : Lemon & Orange Peel Face Wash for Glowing, Fair, Clear & Beautiful skin : बाजारांत विकत मिळणारे महागडे केमिकल्सयुक्त फेसवॉश कशाला? घरीच करा संत्री - लिंबाच्या सालींचा नॅचरल फेसवॉश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 19:20 IST2024-12-27T19:19:10+5:302024-12-27T19:20:34+5:30

Homemade Facewash : Homemade Facewash For Daily Use : How To Make Orange & Lemon Peel Face Wash at Home : Lemon & Orange Peel Face Wash for Glowing, Fair, Clear & Beautiful skin : बाजारांत विकत मिळणारे महागडे केमिकल्सयुक्त फेसवॉश कशाला? घरीच करा संत्री - लिंबाच्या सालींचा नॅचरल फेसवॉश...

How To Make Orange & Lemon Peel Face Wash at Home Lemon & Orange Peel Face Wash for Glowing, Fair, Clear & Beautiful skin | संत्री - लिंबाच्या साली फेकू नका, त्यापासून घरीच करा होममेड फेसवॉश, पैशांची बचत-स्किन दिसेल ग्लोइंग...

संत्री - लिंबाच्या साली फेकू नका, त्यापासून घरीच करा होममेड फेसवॉश, पैशांची बचत-स्किन दिसेल ग्लोइंग...

ऋतू कोणताही असो आपण प्रत्येक ऋतूत त्वचेची तितकीच काळजी घेतो. अनेक प्रकारचे स्किन प्रॉब्लेम्स होऊ नये किंवा त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण दिवसांतून किमान ३ ते ४ वेळा तरी फेसवॉश (How To Make Orange & Lemon Peel Face Wash at Home) करतो. फेसवॉश केल्याने आपल्याला फ्रेश तर वाटतेच शिवाय आपल्या त्वचेवरील घाण, धूळ, माती, धूलिकण धुवून निघण्यास अधिक मदत होते. अशाप्रकारे दिवसांतून ठराविक वेळाने आपल्या चेहऱ्याची त्वचा धुवून स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. त्वचेच्या स्वच्छतेसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेसवॉश (Homemade Facewash) वापरतो. आपल्यापैकी सगळ्याचजणी त्वचेला सूट होणारा आणि त्वचेची काळजी घेणारा फेसवॉश कायम वापरत असतात. परंतु कितीही महागडा किंवा चांगल्या प्रतीचा फेसवॉश (Homemade Facewash For Daily Use) असला तरीही त्यात कमी - अधिक प्रमाणांत केमिकल्स असतात. त्यामुळे दिर्घकाळ जर आपण त्वचेसाठी असा केमिकल्सयुक्त फेसवॉश वापरत राहिलो तर त्वचेचे नुकसान होऊ शकते(Lemon & Orange Peel Face Wash for Glowing, Fair, Clear & Beautiful skin).

यासाठी घरगुती उपाय म्हणून आपण घरच्याघरीच तयार केलेला नॅचरल होममेड फेसवॉश वापरु शकतो. हिवाळा म्हटलं की संत्र्यांचा सिझन असतो. अशावेळी संत्री खाऊन त्याची सालं फेकून न देता आपण ही सालं वापरुन त्यापासून घरगुती नैसर्गिक फेसवॉश झटपट तयार करु शकतो. संत्री आणि लिंबाच्या साली फेकून न देता त्यापासून नॅचरल फेसवॉश कसा तयार करायचा ते पाहूयात.

साहित्य :- 

१. संत्र्याची साल - १ कप 
२. लिंबाची साल - १ कप
३. गरम पाणी - १ कप 
४. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून 
५. मुलतानी माती - २ टेबलस्पून 
६. काचेची बाटली किंवा कंटेनर - १ 

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स होतील गायब, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...


भरपूर मेकअप करूनही अभिनेत्री लपवू शकत नाहीत हे ४ स्किन प्रॉब्लेम्स, कारण त्वचेच्या या समस्या...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये संत्र्याची व लिंबाची साल दोन्ही एकत्रित घ्यावी. 
२. आता या बाऊलमध्ये थोडे गरम पाणी ओतावे. गरम पाण्यांत संत्री व लिंबाच्या साली किमान २० मिनिटे भिजत ठेवाव्यात. 
३. २० मिनिटानंतर एका मिक्सरच्या भांड्यात या साली आणि पाणी घेऊन एकत्रित वाटून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. 
४. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली संत्री व लिंबाच्या सालींची पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. 

५. या बाऊलमध्ये काढून घेतलेल्या पेस्टमध्ये तांदुळाचे पीठ व मुलतानी माती घालावी. 
६. आता चमच्याच्या मदतीने सगळे जिन्नस एकत्रित हलवून घ्यावे. 
७. संत्री व लिंबाच्या सालींचा हा तयार फेसवॉश एका काचेच्या एअर टाईट कंटेनर किंवा बाटलीत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवावा. (हा संत्री व लिंबाच्या सालींचा तयार होममेड फेसवॉश फ्रिजमध्ये किमान ७ दिवस आपण स्टोअर करुन ठेवू शकतो.)

हा घरगुती फेसवॉश वापरायचा कसा ? 

संत्री आणि लिंबाच्या सालींपासून तयार करण्यात आलेला हा फेसमास्क आपण साबणाप्रमाणेच त्वचेवर लावू शकतो. त्यानंतर त्वचेला हळुवार हलक्या हाताने मसाज करावा. मग पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. अशाप्रकारे आपण संत्री आणि लिंबाच्या साली न फेकता त्यापासून घरच्याघरीच नॅचरल होममेड फेसवॉश तयार करु शकतो.

Web Title: How To Make Orange & Lemon Peel Face Wash at Home Lemon & Orange Peel Face Wash for Glowing, Fair, Clear & Beautiful skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.