Lokmat Sakhi >Beauty > सुई- दोरा न वापरताही करता येईल सैलसर ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग! कसं? एक सोपी युक्ती

सुई- दोरा न वापरताही करता येईल सैलसर ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग! कसं? एक सोपी युक्ती

Loose Blouse Hacks: ऐनवेळेला अशी पंचाईत अनेकदा होते. त्यावेळी आपल्याकडे सुई- दोरा चटकन मिळेल, असं काही सांगता येत नाही. म्हणूनच ही एक सोपी युक्ती नेहमीसाठीच लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 01:25 PM2022-11-07T13:25:36+5:302022-11-07T13:26:16+5:30

Loose Blouse Hacks: ऐनवेळेला अशी पंचाईत अनेकदा होते. त्यावेळी आपल्याकडे सुई- दोरा चटकन मिळेल, असं काही सांगता येत नाही. म्हणूनच ही एक सोपी युक्ती नेहमीसाठीच लक्षात ठेवा.

How to make perfect fitting blouse from loose blouse without stitching it? | सुई- दोरा न वापरताही करता येईल सैलसर ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग! कसं? एक सोपी युक्ती

सुई- दोरा न वापरताही करता येईल सैलसर ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग! कसं? एक सोपी युक्ती

Highlightsहा उपाय वापरून तुम्ही कंबरेला सैल हाेणारं ब्लाऊज अवघ्या काही मिनिटांत तुमच्या मापाचं करू शकता. अशा पद्धतीने फिटिंग केलेलं ब्लाऊज मागच्या बाजूने अतिशय आकर्षक दिसतं. 

आजकाल साड्यांवर कॉन्ट्रास्ट रंगांचं ब्लाऊज (hacks for perfect fitting of blouse) सहज घालता येतं. त्यामुळे कोणतीही साडी आणि त्यावर कोणतंही ब्लाऊज असं सहज चालून जातं. साडी आपण कुणाचीही घालू शकतो. घट्ट ब्लाऊज असेल तर ते ही चटकन उसवून आपल्या मापाचं करू शकतो. पण ब्लाऊज जर सैल असेल तर त्याची झटपट फिटिंग करताना मात्र अडचण होते. शिवाय प्रत्येक वेळी आपल्याजवळ सुई- दोरा उपलब्ध असेलच, असं नाही. त्यामुळे सैलसर ब्लाऊज सुई- दोरा न वापरता अगदी परफेक्ट फिटिंगचं कसं करायचं आणि ते ही अगदी झटपट हे सांगणारी ही ट्रिक नेहमीसाठी लक्षात ठेवा.

 

हा उपाय reenaz_world या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय वापरून तुम्ही कंबरेला सैल हाेणारं ब्लाऊज अवघ्या काही मिनिटांत तुमच्या मापाचं करू शकता. यासाठी बांगडी आणि एखादं रबर बॅण्ड तुम्हाला लागणार आहे. बांगडीच्या मापावरून तुम्ही तुमच्या ब्लाऊजी तुम्हाला पाहिजे तशी फिटिंग करू शकता. शिवाय अशा पद्धतीने फिटिंग केलेलं ब्लाऊज मागच्या बाजूने अतिशय आकर्षक दिसतं. 

 

कशी करायची सैलसर ब्लाऊजची फिटिंग?
१. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एक बांगडी आणि एखादं रबरबॅण्ड तुमच्या जवळ ठेवा. 

२. जे ब्लाऊज मापाचं करायचं आहे, ते एका टेबलवर ठेवा.

३. आता बांगडी घेऊन ती ब्लाऊजच्या मागच्या भागावर मध्यभागी ठेवा.

४. त्यानंतर त्या बांगडीच्या भोवती केसांना लावतो, त्या पद्धतीने रबरबॅण्ड लावून टाका. हवं तर एकाऐवजी दोन रबरबॅण्डचा वापर करा.

५. आता हे ब्लाऊज पोटात टाईट होऊन तुमच्या अगदी मापाचं होऊन जाईल. 


 

Web Title: How to make perfect fitting blouse from loose blouse without stitching it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.