Join us  

अळशीचा हा घ्या उपाय! केस कितीही ड्राय-खराब असो, काही मिनिटांत होतील सॉफ्ट आणि सिल्की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 6:14 PM

How To Make Perfect Flaxseed Gel At Home For Hair : या घरगुती हेअर जेलमुळे केसांच्या अनेक समस्या तर दूर होतातच, केस सिल्की आणि शायनी होण्यास मदत मिळते.

वाढते प्रदुषण, बदलती लाइफस्टाइल, चुकीच्या आहार पद्धती यांचा परिणाम आपल्या त्वचा व केसांवर होत असतो. सध्या अनेकांना केसांच्या वेगवेगळ्या समस्या सतावत आहे. स्त्री असो किंवा पुरुष सगळ्यांनाच केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. केसांत कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे, केसगळती, केसांची वाढ न होणे (A HOMEMADE HAIR STRAIGHTENING GEL FOR SMOOTH AND SHINY HAIR) यांसारख्या केसांच्या अनेक समस्या असतात. केसांच्या या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण केसांवर अनेक उपाय करुन बघतो. केसांचे आरोग्य आणि सौंदर्य चांगले राहावे म्हणून आपण हेअर मास्क, हेअर ऑइल, हेअर शाम्पू अशा अनेक गोष्टींचा वापर करतो(How do you make flaxseed gel for hair growth and thickness).

केसांच्या अनेक समस्या निर्माण होणे ही एक कॉमन गोष्ट झाली आहे. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी इतर हेअर प्रॉडक्ट्सोबतच आपण हेअर जेलचा देखील वापर करतो. रुक्ष केस, केसांचा फ्रिजीनेस, केस गळने यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हेअर जेल वापरतो. परंतु हे विकतचे मिळणारे केमिकल्सयुक्त हेअर जेल वापरण्यापेक्षा आपण घरच्याघरी होममेड नॅचरल हेअर जेल बनवून वापरु शकतो. या घरगुती हेअर जेलमुळे (How To Make Perfect Flaxseed Gel At Home For Hair) केसांच्या अनेक समस्या तर दूर होताच शिवाय केस सिल्की आणि शायनी होण्यास मदत मिळते. हे होममेड हेअर जेल नेमके कसे बनावे याची सोपी कृती पाहूयात(How to Make and Use Flaxseed Gel In Your Haircare Routine).

हेअर जेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. पाणी - २ ग्लास २. अळशीच्या बिया - १ टेबलस्पून ३. एलोवेरा जेल - १ कप ४. खोबरेल तेल - २ टेबलस्पून 

शुगर स्क्रबिंग करताय ? थांबा, त्वचेचे होईल नुकसान, शुगर स्क्रबिंग करण्याचे ४ तोटे...  

हेअर जेल बनवण्याची कृती :- 

१. सर्वप्रथम, एक लहान पॅन घ्या आणि त्यात पाणी आणि अळशीच्या बिया घालून दोन्ही ५ मिनिटे उकळवा.  २. त्यानंतर हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. ३. हे पाणी गाळून यातील सगळे जिन्नस बाजूला काढून गाळून घेतलेले पाणी थोडे थंड होऊ द्यावे. ४. हे पाणी थंड झाल्यानंतर यात एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल घालून चांगले मिक्स करा.

आपले हेअर जेल केसांना लावण्यासाठी तयार आहे. 

हेअर जेल कसे वापरावे ?

हे तयार केलेले हेअर जेल घेऊन केसांवर आणि स्कॅल्पला लावून घ्यावे. त्यानंतर हे हेअर जेल केसांवर लावून झाल्यानंतर किमान एक तासभर हे जेल केसांवर तसेच राहू द्यावे. एक तासानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. केस स्वच्छ धुतल्यानंतर आपले केस सिल्की आणि शायनी झालेले दिसतील. 

केसांसाठी शिकेकाई वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती, केस होतील मजबूत, घनदाट - केसांच्या समस्या होतील दूर...  

हा हेअर मास्क केसांना लावण्याचे फायदे... 

अळशीच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते. तसेच या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन 'ई' केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.यातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड केसांना ओलावा देतात त्याचप्रमाणे केस मऊ आणि चमकदार बनवतात. अळशीच्या बियांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी