Lokmat Sakhi >Beauty > रोज सकाळी चेहऱ्याला लावा 'या' पद्धतीने तयार केलेलं राईस वॉटर- दिवाळीपर्यंत पिगमेंटेशन गायब

रोज सकाळी चेहऱ्याला लावा 'या' पद्धतीने तयार केलेलं राईस वॉटर- दिवाळीपर्यंत पिगमेंटेशन गायब

Beauty Tips Using Rice Water: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर खाली सांगितलेल्या पद्धतीने राईस वाॅटर तयार करून चेहऱ्यावर लावा..(how to make rice water for beautiful glowing skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 02:34 PM2024-10-25T14:34:16+5:302024-10-25T14:35:03+5:30

Beauty Tips Using Rice Water: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर खाली सांगितलेल्या पद्धतीने राईस वाॅटर तयार करून चेहऱ्यावर लावा..(how to make rice water for beautiful glowing skin)

how to make rice water for beautiful skin, best remedies for reducing pigmentation and dark spots | रोज सकाळी चेहऱ्याला लावा 'या' पद्धतीने तयार केलेलं राईस वॉटर- दिवाळीपर्यंत पिगमेंटेशन गायब

रोज सकाळी चेहऱ्याला लावा 'या' पद्धतीने तयार केलेलं राईस वॉटर- दिवाळीपर्यंत पिगमेंटेशन गायब

Highlightsहे पाणी एखाद्या काचेच्या एअरटाईट बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून दिल्यास ते ५ ते ६ दिवस चांगले टिकते. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन बऱ्याच प्रमाणात कमी होतात. 

वर्षाचा मोठा सण म्हणजे दिवाळी. लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज असे सगळे सण एकानंतर एक असतातच. पण बऱ्याच ठिकाणी  गेट टुगेदरही आयोजित केले जातात. यानिमित्ताने मित्रमंडळी,  नातलग असे सगळे एकत्र जमून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित  करतात. अशावेळी आपण छान, आकर्षक दिसावं, आपला चेहरा तजेलदार- नितळ असावा, असं प्रत्येकीला वाटणं साहजिकच आहे (Beauty Tips Using Rice Water). अशी सुंदर, नितळ, चमकदार त्वचा काही एका दिवसांत मिळत नाही (how to make rice water for beautiful skin). त्यासाठी काही गोष्टी नियमितपणे कराव्या लागतात. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या तेच आपण आता पाहणार आहोत...

 

चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा उपयोग...

कोरियन ब्यूटी ट्रिटमेंट्स आता अवघ्या जगभर गाजत आहेत. त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करणे, हे कोरियन ब्यूटी ट्रिटमेंट्समध्ये मुख्यत: सांगितलं जातं.

गोडधोड खाऊनही दिवाळीत वजन- शुगर वाढणार नाही, फक्त ५ गोष्टी सांभाळा- एन्जॉय कराल...

त्यानुसारच आता आपण त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी तांदळाचं पाणी कशा पद्धतीने तयार करायचं आणि त्याचा कसा वापर करायचा ते पाहूया. याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ tastytaleswithvidhi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

हा उपाय करण्यासाठी २ चमचे तांदूळ एका वाटीमध्ये घ्या आणि २ ते ३ वेळा पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ५ ते ६ टेबलस्पून पाणी टाकून ते रात्रभर भिजू द्या.

दिवाळीत आकर्षक लूक येण्यासाठी ८ सुंदर हेअरस्टाईल, करायला सोप्या आणि झटपट होणाऱ्या..

दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या. आता गाळून घेतलेल्या राईस वॉटरमध्ये १ चमचा कोरफडीचा गर आणि अर्धी वाटी ग्लिसरीन टाका. हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. दररोज सकाळी चेहरा धुतल्यानंतर हे पाणी चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. 

हे पाणी एखाद्या काचेच्या एअरटाईट बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून दिल्यास ते ५ ते ६ दिवस चांगले टिकते. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन बऱ्याच प्रमाणात कमी होतात. 

 

Web Title: how to make rice water for beautiful skin, best remedies for reducing pigmentation and dark spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.