Lokmat Sakhi >Beauty > त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

How To Make Rice Water For Skin Care: कोरियन मुलींच्या सौंदर्याचं सिक्रेट असणारं राईस वॉटर नेमकं कसं तयार करायचं, हा प्रश्न अनेकींना पडतो. हे बघा त्याचं खास उत्तर...(simple and easy method of making rice water)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 05:53 PM2024-08-13T17:53:04+5:302024-08-13T17:53:56+5:30

How To Make Rice Water For Skin Care: कोरियन मुलींच्या सौंदर्याचं सिक्रेट असणारं राईस वॉटर नेमकं कसं तयार करायचं, हा प्रश्न अनेकींना पडतो. हे बघा त्याचं खास उत्तर...(simple and easy method of making rice water)

How to make rice water For Skin Care and hair care, simple and easy method of making rice water | त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

Highlightsकोरियन मुली त्यांचं सौंदर्य जपण्यासाठी जे राईस वॉटर वापरतात ते केसांसाठी आणि त्वचेसाठी चांंगलंच आहे, हे आपण जाणतो. पण ते नेमकं करावं कसं आणि वापरावं कसं हेच अनेकींना कळत नाही.

सौंदर्य खुलविण्यासाठी वेगवेगळे देसी नुस्के म्हणजेच घरगुती उपाय आपण नेहमीच ट्राय करत असतो. आपण, आपल्या मागची पिढी, त्याच्या मागची पिढी असं पिढी दर पिढी हे देसी नुस्के थोडे थोडे बदलत जातात. त्यात काही वेगवेगळे ट्रेण्ड येत जातात... मागच्या काही वर्षांपासून कोरियन ब्यूटी ट्रेण्ड जगभरात गाजत आहेत. कोरियन मुलींसारखी चमकदार, नितळ त्वचा, चमकदार सिल्की केस हे सध्या जगभरातल्या मुलींसाठी आकर्षण ठरत आहे (How to make rice water For Skin Care and hair care). हे सौंदर्य मिळविण्यासाठी कोरियन मुली तांदळाच्या पाण्याचा खास पद्धतीने वापर करतात. (simple and easy method of making rice water)

 

कोरियन मुली त्यांचं सौंदर्य जपण्यासाठी जे राईस वॉटर वापरतात ते केसांसाठी आणि त्वचेसाठी चांंगलंच आहे, हे आपण जाणतो. पण ते नेमकं करावं कसं आणि वापरावं कसं हेच अनेकींना कळत नाही. त्यासाठीच बघा ही खास माहिती. त्वचेचं आणि केसांंचं सौंदर्य जपण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने राईस वॉटर तयार करण्याची ही एक एकदम सोपी पद्धत पाहा.

फक्त ४ थेंब तेलाची बघा जादू- रोज रात्री ‘हे’ काम करा, आरोग्याच्या तक्रारीच गायब

यासाठी ३ टेबलस्पून तांदूळ घ्या. ते दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या. तुमचं राईस वॉटर झालं तयार. या पाण्यामध्ये तुम्ही गुलाबजल, ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल असं टाकून ठेवू शकता. हे पाणी रोज रात्री झोपण्यापुर्वी तुमच्या चेहऱ्यावर शिंपडा. त्वचेवर खूप छान चमक येईल.


 

राईस वॉटर तयार करण्याची आणखी एक खास पद्धत आहे. या पद्धतीने तयार केलेलं पाणी केसांसाठी वापरा. यामुळे केसांवर छान चमक येईल तसेच ते सिल्की होतील. यासाठी ३ ते ४ चमचे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.

इम्युनिटी वाढविण्यासाठी माधुरी दीक्षित खाते ६ पदार्थ- बघा तिचे पती डॉ. नेने यांचा खास सल्ला...

यानंतर एका पातेल्यात १ ग्लास पाणी घ्या. त्यात तांदूळ टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. तांदूळ जेव्हा अर्धवट शिजल्यासारखे होतील, तेव्हा गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या. ते थंड झालं की त्यामध्ये ॲलोव्हेरा जेल टाकून केसांना लावा. साधारण अर्ध्या तासाने शाम्पू करून केस धुवून टाका. केस छान सिल्की, चमकदार होतील. 

 

Web Title: How to make rice water For Skin Care and hair care, simple and easy method of making rice water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.