Join us  

आता गुलाब पाणी सहज बनवा घरच्याघरी! झटपट सोपी पद्धत, शुद्ध सुगंधी गुलाब पाणी तयार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 7:36 PM

त्वचेची काळजी घेण्याचे प्रयत्न जर गांभिर्यानं करत असाल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरलं जाणारं गुलाब पाणी (rose water) विकत आणण्यापेक्षा घरीच ( homemade rose water) तयार करा. घरच्याघरी गुलाब पाणी तयार करणं (how to make rose water) अगदीच सोपं आहे.

ठळक मुद्देगुलाब पाणी तयार करताना गुलाबाच्या पाकळ्या बुडतील इतकंच पाणी घ्यावं. पाणी उकळताना गॅसची आच मोठी असू नये. घरी तयार केलेलं गुलाब पाणी त्वचेसाठी जास्त सुरक्षित आणि असरदार ठरतं. 

त्वचा नितळ, सुंदर आणि उजळ करण्यासाठी गुलाब पाण्याचा (rose water)  वापर फायदेशीर असतो. त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग होतो. हर्बल टोनर, त्वचा स्वच्छ करण्यासाठी केले जाणारे स्क्रब यात गुलाब पाण्याचा ( rose water benefits)  उपयोग केला जातो. चेहेऱ्यावरील डाग, मुरुम पुटकुळ्या या समस्यांवर गुलाब पाणी असरदार उपाय ठरतो. नाजूक त्वचा जपण्यासाठी गुलाब पाण्यावर विश्वास ठेवला जातो. पण बाहेरुन विकत आणलेल्या गुलाब पाण्याच्या शुध्दतेची खात्री मात्र देता येत नाही. त्यात भेसळीची शक्यता असू शकते. असं गुलाब पाणी चेहेऱ्यासाठी वापरल्यास ते त्वचेस फायदे  मिळवून देण्याऐवजी त्वचेच्या नुकसानीस कारणीभूत ठरु शकतं. त्वचेची काळजी घेण्याचे प्रयत्न जर गांभिर्यानं करत असाल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरलं जाणारं गुलाब पाणी विकत आणण्यापेक्षा घरीच तयार  (homemade rose water) करा. घरच्याघरी गुलाब पाणी तयार ( how to make rose water) करणं अगदीच सोपं आहे.

Image:  Google

 

घरच्याघरी गुलाबपाणी कसं तयार करणार?

अतिशय सोप्या पध्दतीनं घरच्याघरी शुध्द गुलाब पाणी तयार करता येतं. घरी तयार केलेलं गुलाब पाणी सौंदर्योपचारा फायदेशीर मानलं जातं. गुलाब पाणी तयार करण्यासाठी गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या आणि  2-3 कप स्वच्छ पाणी या दोनच गोष्टींची गरज आहे.

Image: Google

गुलाब पाणी तयार करण्यासाठी ताजी गुलाबाची फुलं घ्यावीत. फुलाच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्याव्यात. मग एका भांड्यात  2-3 कप शुध्द पाणी घ्यावं. त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात. गुलाबाच्या पाकळ्या बुडतील इतकंच पाणी घालावं. जास्त पाणी घालू नये. हे भांडं गॅसवर मध्यम आचेवर ठेवावं. मोट्या आचेवर पाणी उकळू नये. मध्यम आचेवर पाणी उकळायला लागलं की गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरलेला दिसेल. रंग पाण्यात चांगला उतरला की गॅस बंद करावा. थोडा वेळानं पाणी गाळून घ्यावं. पाणी पूर्ण थंड झालं की स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावं. 

Image: Google

गुलाब पाणी तयार करण्याची दुसरी पध्दतही आहे. यात एका मोठ्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात. पाकळ्या बुडतील एवढंच पाणी त्यात घालावं. मध्यम आचेवर पाणी उकळू द्यावं.  पाणी उकळायला लागलं की भांड्यावर झाकणी उलटी करुन ठेवावी. झाकणीवर बर्फाचे तुकडे ठेवावे. पाणी चांगलं उकळू द्यावं.  गॅस बंद करावा. पाणी गाळून घ्यावं. पाणी थंड झालं की स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावं. घरी तयार केलेलं गुलाब पाणी त्वचेसाठी एकदम सुरक्षित आणि उपयुक्त ठरतं.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी