सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपण सर्वजण अनेक कामांमध्ये व्यस्त असतो. प्रदूषण, वारा, वेळ आणि तणाव यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील एक सगळ्यांना सतावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे केसांची. बरेचजणांना केसांच्या अनेक समस्यांनी सतावले आहे. परंतु केसांच्या या अनेक समस्या दूर करण्यासाठी बाजारांत सध्या वेगवेगळ्या ब्रँडचे असंख्य प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात. ही उत्पादने केसांच्या समस्या दूर करण्याचा दावा करतात. परंतु या उत्पादनांमध्ये अनेक रसायने, रंग आणि संरक्षके असतात जे आपल्या केसांच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. यांच्या नियमीत वापराने केसांचे नुकसान होऊ शकते.नैसर्गिक उपचार हे तुमच्या केसांसाठी सर्वोत्तम आणि फायदेशीर पर्याय असू शकतात. कारण केसांचे आरोग्य खराब करत नाहीत. याउलट केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तर यातील काही रसायने विषारी पदार्थांपासून आपल्या केसांचे संरक्षण करण्यासाठी मदत करतात.
पूर्वीच्या काळापासून केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी, केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळा, रिठा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जात असे. रीठा हे त्याच्या पारंपारिक औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. केस स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. रीठाच्या वापरामुळे केस चमकदार, निरोगी आणि हेल्दी राहतात. डोक्यावरील स्कॅल्पचे पोषण करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी रीठचा वापर केला जातो. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी रीठचा आपण कोणकोणत्या पद्धतीने वापर करु शकतो(How To Make Shampoo, Conditioner And Hair Mask From Reetha Seeds).
रीठचा कोणत्या पद्धतीने वापर करता येईल ?
१. केसांच्या स्वच्छतेसाठी करा वापर :- रीठाच्या मदतीने आपण कोणत्याही शॅम्पू किंवा साबणाशिवाय केस मुळापासून स्वच्छ करू शकतो. यासाठी मूठभर रिठा कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी हाताने मॅश करा. ते उकळल्यानंतरदेखील आपण मॅश करू शकतो. ते मॅश झाल्यावर बिया काढून टाका आणि आपला शॅम्पू तयार आहे. आता ओल्या केसांवर आणि मुळांवर हा शॅम्पू लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. नंतर पाण्याने धुवा. केस स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होईल.
सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...
२. रीठा हेअर मास्क :- जर आपले केस कमकुवत झाले असतील तर आपण हेअर टॉनिक म्हणूनही रीठाचा वापर करू शकता. यासाठी आवळा आणि शिकाकाई, रिठा रात्रभर गरम पाण्यात भिजण्यासाठी ठेवा. हे भिजत घालण्याऐवजी आपण पावडर देखील वापरू शकता. भिजत घातलेल्या आवळा आणि शिकाकाई, रिठा मॅश करून त्यांची पेस्ट बनवा. आता हेअर मास्कप्रमाणे केसांना लावा. १ तासानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आपण दर आठवड्याला केसांना हा रीठचा हेअर मास्क लावू शकता.
३. रिठा तेल :- एक वाटी खोबरेल तेल घेऊन त्यात रिठा, आवळा घालून हे तेल गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावे. या गरम तेलात रिठा, आवळा रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे तेल गाळून एका बाटलीत भरून ठेवावे. हे तेल रात्री झोपताना टाळूवर आणि केसांना लावा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस लवकर वाढतील आणि केस चमकदार आणि मऊ होतील.
४. रिठा हेअर केअर मास्क :- एका भांड्यात रिठा, शिककाई आणि आवळा पावडर समान प्रमाणात घेऊन त्यात थोडे पाणी घालून त्याची घट्ट पेस्ट बनवा. हि पेस्ट रात्रभर तशीच झाकून ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी ही पेस्ट केसांवर लावा, त्यानंतर दही घेऊन त्यात जास्वंदीच्या पानांची बारीक पूड करून टाकावी ही पेस्ट मग केसांना लावावी, यामुळे केसांच्या वाढीस मदत होते.
उन्हाळ्यात कुरळ्या केसांचा ड्रायनेस वाढतो? ५ सोपे उपाय, कुरळे केसही होतील मऊ आणि चमकदार...