Join us  

केस गळणं थांबतच नाहीय? ५ मिनिटांत घरीच बनवा शिकेकाई शाम्पू; केस होतील लांबसडक-दाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 1:04 PM

How to make shikakai shampoo at home : या शाम्पूमुळे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवणार नाहीत.

केसांना काळे आणि दाट बनवण्यासाठी तुम्ही केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करत असाल पण शिकेकाई शाम्पूचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. या शाम्पूची खासियत अशी की कोणत्याही केमिकल्सचा वापर न करतात घरच्याघऱी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा शाम्पू तयार केला जातो.  या शाम्पूमुळे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवणार नाहीत. (How to make homemade shakekai shampoo for hair growth)

हा शाम्पू बनवण्यासाठी तुम्हाला २५० ग्राम शिकेकाई,  १०० ग्राम मेथीचे दाणे, १०० ग्राम रिठा,  ५० ग्राम सुका आवळा, १० ते १५ सुकलेले कढीपत्ते आणि १० ते १५ कडुलिंबाच्या पानांची आवश्यकता असेल. शिकेकाई  शॅम्पू बनवण्यासाठी हे साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक दळून घ्या. त्यानंतर याची पावडर बनवून ती चाळून  घ्या. नंतर एका ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. (Shikakai Shampoo for Hair)

शॅम्पू केसांवर कसा  लावायचा?

जेव्हाही कधी तुम्ही हेअर वॉश करत असाल तेव्हा  भांड्यातून ३ ते ४ चमचे पावडर काढा आणि पाण्यात मिसळा. नंतर केसांना लावा आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटांसाठी केसांवर लावलेले असू द्या. त्यानंतर केस ताज्या पाण्यानं स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा हा होम मेड शॅम्पू केसांना लावल्यानं केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल.

शिकेकाई शॅम्पू केसांना लावण्याचे फायदे

शिकेकाई एंटी ऑक्सिडेंट्ससह व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन के आणि व्हिटामीन डी ने परीपूर्ण असते. हे व्हिटामीन्स केसांना पोषण देण्यासह हेल्दीसुद्धा ठेवतात. शिकेकाईची पावडर बाजारातही सहज उपलब्ध होते. शिकेकाईमध्ये इसेंशियल व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात असतात.  यात व्हिटामीन सी सुद्धा असते. यामुळे स्काल्पमध्ये कोलोजनचे उत्पादन वाढून हेअर ग्रोथ चांगली होते. हा एंटी ऑक्सि़डेंट्सचा खूप चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे केसांमध्ये तयार होणारे फ्री रॅडिकल्सचे डॅमेज रोखता येतं.

१) हा होममेड शॅम्पू (Home Made Shampoo) लावल्यानं केस वेगानं वाढतात.

२) गळलेले केस(Hair fall)  पुन्हा परत येतात.

४) केसांचं तुटणं  (Splitting hair) आणि केस गळणंसुद्धा कमी होतं.

५) केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.

६) स्काल्प इन्फेक्शनचा धोकाही टळतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी