Lokmat Sakhi >Beauty > लग्नसराई स्पेशल: चेहऱ्याला लावा 'हा' खास लेप, फक्त १५ मिनिटांत मिळेल स्किन पॉलिशिंगसारखा इफेक्ट 

लग्नसराई स्पेशल: चेहऱ्याला लावा 'हा' खास लेप, फक्त १५ मिनिटांत मिळेल स्किन पॉलिशिंगसारखा इफेक्ट 

How To Make Skin Polishing Face Mask At Home: सध्याच्या लग्नसराईच्या काळात हा उपाय जवळपास सगळ्याच वयोगटातील महिलांना अतिशय उपयुक्त ठरणारा आहे.(how to get radiant glowing skin in just 15 minutes?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2024 04:23 PM2024-12-07T16:23:11+5:302024-12-07T16:23:49+5:30

How To Make Skin Polishing Face Mask At Home: सध्याच्या लग्नसराईच्या काळात हा उपाय जवळपास सगळ्याच वयोगटातील महिलांना अतिशय उपयुक्त ठरणारा आहे.(how to get radiant glowing skin in just 15 minutes?)

how to make skin polishing face mask at home, how to get radiant glowing skin in just 15 minutes, best homemade face pack for removing tanning and dead skin | लग्नसराई स्पेशल: चेहऱ्याला लावा 'हा' खास लेप, फक्त १५ मिनिटांत मिळेल स्किन पॉलिशिंगसारखा इफेक्ट 

लग्नसराई स्पेशल: चेहऱ्याला लावा 'हा' खास लेप, फक्त १५ मिनिटांत मिळेल स्किन पॉलिशिंगसारखा इफेक्ट 

Highlightsहा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स निघून जाण्यासही मदत होईल. 

सध्या सगळीकडेच लग्नसराईची धूम आहे. बऱ्याचदा आपल्यालाही लग्नाचं, साखरपुड्याचं, मौंजीचं आमंत्रण येतं. पण तिथे छान तयार होऊन जाण्यासाठी मुळात आपली त्वचा किंवा आपला चेहरा नितळ, स्वच्छ असायला हवा ना... नेमकं तेवढ्यासाठीच आपल्याकडे वेळ नसतो. रोजच्या कामाच्या गडबडीत आपण एवढं अडकून जातो की त्वचेची काळजी घेण्यासाठी, फेशियल- क्लिनअप करण्यासाठी पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नाही (best homemade face pack for removing tanning and dead skin). म्हणूनच अशावेळी हा एक सोपा उपाय घरच्याघरी लगेच करून पाहा (how to get radiant glowing skin in just 15 minutes). हा उपाय तुम्हाला १५ मिनिटांतच स्किन पॉलिशिंग केल्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ठ इफेक्ट देईल.(how to make skin polishing face mask at home?) 

 


घरच्याघरी स्किन पॉलिशिंग कसं करावं?

घरच्याघरी स्किन पॉलिशिंग कसं करावं किंवा चेहऱ्यावर झटपट ग्लो आणणारा उपाय कसा करावा, याविषयी माहिती सांगणारा उपाय dt.gagan_sidhu या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घ्या.

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा पिठी साखर टाका.

आता हे तीन पदार्थ व्यवस्थित हलवा आणि त्यामध्ये खोबरेल तेल टाका. वाटीतले तिन्ही पदार्थ व्यवस्थित भिजतील आणि चेहऱ्यावर लावता येण्यासारखा लेप तयार होईल, एवढंच खोबरेल तेल टाकावं.

 

त्यानंतर आता हा लेप चेहऱ्याला लावा. लेप लावल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करण्याची गरज नाही. त्यानंतर साधारण १५ मिनिटांनी हळूवार मसाज करून लेप धुवून टाका.

हा उपाय केल्यानंतर त्वचेवरची डेडस्किन, ओपन पोअर्स, टॅनिंग निघून जाईल. शिवाय त्वचा अतिशय नितळ, स्वच्छ, चमकदार होईल.

पांढऱ्याशुभ्र कपड्यावर चहाचा डाग पडला? चटकन करा 'हा' उपाय, डाग शोधूनही सापडणार नाही

हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करण्यास हरकत नाही. पण तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर हा उपाय आठवड्यातून फक्त एकदाच करा. 

हा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स निघून जाण्यासही मदत होईल. 


 

Web Title: how to make skin polishing face mask at home, how to get radiant glowing skin in just 15 minutes, best homemade face pack for removing tanning and dead skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.