Join us  

ग्रीन टी आणि कोरफड वापरुन करा घरच्याघरी नाइट जेल, होममेड नाइट जेल वापरण्याचे ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 5:30 PM

रात्रीच्या वेळेस त्वचेवर नैसर्गिक घटक(natural things for beauty) वापरल्यास त्याचा चांगला परिणाम त्वचेवर होतो. म्हणूनच रात्रीच्या वेळेस लावण्यासाठीचं नाइट जेल (night gel for skin) घरच्याघरी केल्यास त्याचे चांगले परिणाम त्वचेवर दिसून येतात. 100 टक्के नैसर्गिक घटकांचा वापर केलेलं नाइट जेल अवघ्या 5-10 मिनिटात (how to make night gel at home) तयार करता येतं.

ठळक मुद्देदिवसभर त्वचेचं संरक्षण करण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहेऱ्याला होममडे नाइट जेल लावावं.घरी तयार केलेल्या नाइट जेलमधील कोरफड जेल  खोलवर जावून त्वचेचं संरक्षण करतं.नाइट जेलमधील ग्रीन टीमुळे त्वचा डागरहित आणि मऊ मुलायम होते. 

 आपली त्वचा छान तजेलदार दिसावी, चेहेऱ्यावर सुरकुत्या दिसू नये अशी प्रत्येकीची इच्छा असते. त्वचा चांगली व्हावी म्हणून  अनेक क्रीम्स-लोशन्स-जेल  त्वचेला लावले जातात. त्वचेच्या सौंदर्यासाठी जितकं बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहाल तितकी आपली त्वचा खराब होते असं नैसर्गिक उपायांचा वापर करणारे सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात.  घरी तयार केलेली सौंदर्य उत्पादनं (homemade beauty products)  वापरल्यास नैसर्गिक सौंदर्य जपलं जातं आणि वाढतंही. त्वचा उत्तम राखण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहेऱ्याला नाइट क्रीम किंवा नाइट जेल (night cream for skin care)  लावणं गरजेचं असतं. रात्रीच्या वेळेस त्वचेवर नैसर्गिक घटक वापरल्यास त्याचा चांगला परिणाम त्वचेवर होतो. म्हणूनच रात्रीच्या वेळेस लावण्यासाठीचं नाइट जेल घरच्याघरी (homemade night gel)  केल्यास त्याचे चांगले परिणाम त्वचेवर दिसून येतात. 100 टक्के नैसर्गिक घटकांचा वापर केलेलं नाइट जेल (how to make night gel at home) अवघ्या 5-10 मिनिटात तयार करता येतं.

Image: Google

घरच्याघरी नाइट जेल तयार करताना..

घरच्याघरी नाइट जेल तयार करण्यासाठी 1 पाउच ग्रीन टी, 2 चमचे कोरफड जेल, 1 ते 2 विटॅमिन इ कॅप्सूल आणि  2 चमचे काॅफी पावडर घ्यावी.  नाइट जेल तयार करताना आधी ग्रीन टीचं 1 पाउच वापरुन पाणी तयार करुन घ्यावं. एका मोठ्या वाटीत ग्रीन टीचं पाणी घ्यावं. त्यात अर्धा चमचा काॅफी पावडर घालून ती ग्रीन टीच्या पाण्यात चांगली मिसळून घ्यावी. ग्रीन टी आणि काॅफीचं हे मिश्रण थोडं घट्टसर असावं. नंतर यात विटॅमिन ई कॅप्सूल फोडून घालावी. हे सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावं. या मिश्रणात 2 चमचे कोरफड जेल घालावं. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावं. हे मिश्रण एका छोट्या हवाबंद डब्बीत भरुन ठेवावं. रोज रात्री झोपताना हे नाइट जेल चेहेऱ्यास लावावं. सकाळी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्वचा जर तेलकट असेल तर नाइट जेल तयार करताना ग्रीन टी ऐवजी टी ट्री ऑइल वापरल्यास त्याचा तेलकट त्वचेला चांगला फायदा होतो. 

Image: Google

घरगुती नाइट जेल वापरल्यास..

1. घरी तयार केलेलं नाइट जेल रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहेऱ्याला लावल्यास त्वचेचं प्रदूषण, सूर्याची अति नील किरणांमुळे होणारं नुकसान यापासून संरक्षण होतं. 

2. या नाइट जेलमध्ये कोरफडचा वापर केलेला असल्यानं हे नाइट जेल त्वचेची खोलवर जावून काळजी घेतं, त्वचा दुरुस्त करण्यास मदत करतं. 

3. काॅफीमुळे चेहेऱ्याचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते. 

4. घरी तयार केलेल्या या नाइट जेलमध्ये ग्रीन टी वापरलेला असल्यानं चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या कमी होतात. त्वचेवरील डाग कमी होतात. 

5. नाइटजेलमधील विटॅमिन इ कॅप्सूलमुळे त्वचा उजळते. यातील ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे त्वचा मऊ मुलायम आणि तजेलदार होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी