Lokmat Sakhi >Beauty > दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

Sour Milk Water Face Serum Recipe : सिरम आपण विकत आणतो पण घरीच नासलेल्या दुधाचेही उत्तम सिरम बनते, कसे ? ही घ्या कृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 09:20 PM2023-08-30T21:20:54+5:302023-08-30T21:47:38+5:30

Sour Milk Water Face Serum Recipe : सिरम आपण विकत आणतो पण घरीच नासलेल्या दुधाचेही उत्तम सिरम बनते, कसे ? ही घ्या कृती...

How To Make Sour Milk Water Face Serum At Home. | दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

'दूध' (Milk) हे आपल्याकडे पूर्णान्न मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी आपण रोज दूध पितो. दूध हा रोजच्या वापरातील आवश्यक पदार्थ असला तरीही तो नाशवंत पदार्थ आहे. दूध व्यवस्थित गरम केल्यानंतरही अनेकदा दूध खराब होऊन नासते. मुख्यत्वे करुन उन्हाळ्यात दूध खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी ब-याचदा लोक नासलेल्या दुधाचे पनीर बनवतात. तर काहीजण चक्क हे नासलेल दूध फेकून देतात. परंतु आपल्याला कदाचित माहित नसेल पण  नासलेल दूध हे आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. 

जर आपण  नासलेले दूध फेकून देत असाल तर, असे करु नका. खरं पाहता, नासलेल्या दुधात ब-याच प्रमाणात प्रोटीन असतात. तसेच हे दूध खूपच पौष्टिक असते. नासलेल्या दुधात भरपूर लॅक्टिक ऍसिड, प्रथिने, कॅल्शियम, खनिजे इत्यादी पौष्टिक घटक असतात. जे सर्व प्रकारच्या त्वचेचे पोषण करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. इतकेच नाही तर त्वचेला ग्लोइंग करण्यातही खूप मदत होते. या नासलेल्या दुधापासून आपण आतापर्यंत पनीर, रसगुल्ला, रसमलाई व इतर अनेक मिठाया बनवलेल्या पाहिल्या असतील. परंतु या नासलेल्या दुधाचा उपयोग करुन आपण त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी फेस सीरम देखील बनवू शकतो. या नासलेल्या दुधापासून फेस सिरम नेमके कसे बनवायचे ते पाहूयात(How To Make Sour Milk Water Face Serum At Home).

फेस सिरम बनवण्याचे साहित्य :-

१. कच्चे दूध - १ कप 
२. लिंबू - अर्धा  
३. हळद - चिमूटभर  
४. ग्लिसरीन - १ टेबलस्पून  
५. मीठ - चिमूटभर

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

फेस सिरम बनवण्याची कृती :- 

१. हे फेस सिरम बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावे. 
२. दूध गरम झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळून घ्यावा, या क्रियेमुळे दूध नासते. थोड्यावेळाने नासलेले दूध व त्यातील पाणी हे वेगवेगळे होऊ लागेल.  
३. आता एक गाळणी घेऊन हे दूध गाळून, नासलेले दूध व पाणी असे वेगळे करून घ्यावे. 
४. त्यानंतर या वेगळ्या गाळून घेतलेल्या पाण्यांत हळद, ग्लिसरीन, मीठ घालून हे सिरम चमच्याच्या मदतीने एकजीव करुन घ्यावे. 
५. हे सिरम थोडे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावे. 
६. आपले फेस सिरम वापरण्यासाठी तयार आहे. एकदा तयार करून ठेवलेले हे सिरम आपण पुढील किमान ३ दिवस तरी वापरु शकता. 

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस

हे फेस सिरम नेमके कसे वापरावे ? 

सर्वप्रथम हे फेस सिरम चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर चेहरा व्यवस्थित पुसून कोरडा करून घ्या. आता अर्धा चमचा  फेस सिरम हातावर घेऊन मानेपासून सुरुवात करुन वरपर्यंत चेहऱ्याला लावावे. हे फेस सिरम त्वचेत जोपर्यंत संपूर्णपणे मुरत नाही तोपर्यंत हातांनी मसाज करत राहावा. हे फेस सिरम आपण शक्यतो रात्री झोपताना चेहऱ्याला लावून झोपावे व सकाळी उठून स्वच्छ पाण्याने चेहेरा धुवून घ्यावा. 

महागड्या ट्रिटमेण्ट केल्यावर केसांना तेल लावावे की नाही ? हेअर एक्सपर्ट सांगतात, एक सिक्रेट...

'सर जो तेरा चकराये'.. अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय केसांना चंपी करताना नेमकं कोणतं तेल वापरणं उत्तम

नासलेल्या दुधाचे फेस सिरम लावण्याचे फायदे...  

१. या फेस सिरममध्ये लॅक्टिक ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते जे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. 

२. तसेच हे मृत त्वचा काढून टाकण्याचे आणि त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवण्याचे काम करते. 

३. त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो आणि चेहऱ्यावरचे काळे डाग दूर होतात.

४. आपली त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल.

Web Title: How To Make Sour Milk Water Face Serum At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.