धूळ, प्रदुषण, ऊन यामुळे त्वचा खराब होत जाते. त्वचेवर डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन दिसू लागतात. यामुळे मग त्वचा निस्तेज, डल होते आणि त्वचेवरची चमक जाते. त्वचेवरचं पिगमेंटेशन खूप वाढलं तर त्वचा एकसारखी दिसत नाही. कुठे अगदीच काळवंडलेली दिसते, तर कुठे उजळ वाटते. म्हणूनच त्वचेवरचं पिगमेंटेशन कमी करून इव्हन टोन स्किन पाहिजे असेल तर व्हिटॅमिन सी सीरम वापरण्याचा सल्ला दिला जातो (How to make vitamin c serum at home using orange). व्हिटॅमिन सी सीरम बऱ्यापैकी महाग असतं (homemade vitamin c serum). त्यासाठी उगाच एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी व्हिटॅमिन सी सीरम कसं तयार करायचं ते पाहा... (vitamin c serum for glowing skin)
व्हिटॅमिन सी सिरम कसं तयार करायचं?
घरच्याघरी व्हिटॅमिन सी सीरम कसं तयार करायचं, याविषयीची माहिती artkala4u या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हे सीरम तयार करण्यासाठी आपल्याला फक्त १ संत्री आणि गुलाब जल एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत.
वजन वाढण्याचं टेन्शन? 'या' पद्धतीने खा धणे, बघा चमच्याभर धण्यांची कमाल, वजन वाढणारच नाही
सगळ्यात आधी तर एक संत्री घ्या आणि तिच्यावर बारीक बारीक छिद्र पाडून घ्या.
यानंतर एका लहान पातेल्यात थोडं पाणी घ्या आणि त्यात ती संत्री ठेवून २ ते ३ मिनिटे उकळवून घ्या. यानंतर गॅस बंद करा.
संत्री थंड झाली की तिचे सालं काढून घ्या. यानंतर संत्रीची सालं आणि संत्रीचा गर असं सगळं मिक्सरमध्ये एकत्र टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
यानंंतर ही पेस्ट गाळून घ्या आणि त्यात २ टेबलस्पून गुलाब जल टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
दररोज रात्री झोपण्यापुर्वी हे सीरम चेहऱ्यावर स्प्रे करा. काही दिवसांतच त्वचेत खूप छान फरक दिसून येईल.
संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे मारण्यापुर्वी एकदा पॅच टेस्ट जरुर करून बघा.