Lokmat Sakhi >Beauty > काळे कमी पांढरेच केस खूप चमकतात? ५ रूपयांचे 'हे' पदार्थ केसांना लावा, काळभोर केस मिळवा

काळे कमी पांढरेच केस खूप चमकतात? ५ रूपयांचे 'हे' पदार्थ केसांना लावा, काळभोर केस मिळवा

How to make White Hair Black Naturally : (Pandhare kes kale karnyasathi upay) केसांना इस्टंट काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 03:47 PM2023-11-14T15:47:09+5:302023-11-14T15:58:40+5:30

How to make White Hair Black Naturally : (Pandhare kes kale karnyasathi upay) केसांना इस्टंट काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

How to make White Hair Black Permanently : Home remedies to get black hairs in 5 rupees | काळे कमी पांढरेच केस खूप चमकतात? ५ रूपयांचे 'हे' पदार्थ केसांना लावा, काळभोर केस मिळवा

काळे कमी पांढरेच केस खूप चमकतात? ५ रूपयांचे 'हे' पदार्थ केसांना लावा, काळभोर केस मिळवा

सध्याचे खाणं-पिणं, लाईफस्टाईल यांमुळे केस पांढरे होत जातात. (Hair Care Tips) कमी वयात केस पांढरे झाले की आत्मविश्वास कमी होतो. (Akali kes Pandhare Hone Upay) अशात लोक पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी डाय किवा हेअर कलरचा वापर करतात. केसांना इस्टंट काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (How to Turn Grey or White Hair Black) हळूहळू केस डॅमेज होऊ लागतात. अशा स्थितीत तुम्ही केस काळे करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल उपाय करू शकता.  पाच ते दहा रुपयांत मिळणाऱ्या वस्तू केसांसाठी फायदेशीर ठरतील. (How to Black White Hair Naturally)

एलोवेरा जेल

केसांना काळे करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करू शकता. एलोवेरा जेलमध्ये १ चमचा मध आणि आवळा पावडर एकत्र करू शकता. नंतर हे मिश्रण केसांवर लावून जवळपास १ तासासाठी केसांवर लावून ठेवा. नंतर साध्या पाण्याने केस धुवून टाका.  केस करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा या हेअर पॅकचा वापर करू शकता. 

भाज्यांचा रस

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही भाज्यांच्या रस पिणं हेल्दी ठरू शकतं ज्यामुळे केस  काळे होण्यास मदत होईल. गाजर, बीट, कारलं, पालक या भाज्यांचा रस तुम्ही पिऊ शकता. यात आयर्न असते. ज्यामुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. केस नैसर्गिकरित्या काळे होतात.

ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

आवळा

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. आवळे तुम्हाला ५ ते १० रूपायात कुठेही उपलब्ध होतील. १ ते २ आवळे  बारीक करून केसांना लावा.  याव्यतिरिक्त आवळ्याची पेस्ट तुम्ही तेलात मिसळून केसांना लावू शकता. या हेअर ऑईलच्या वापराने केस लवकरात लवकर काळे होण्यास मदत होते. 

काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार

कांद्याचा रस

कांदा असा पदार्थ आहे जो सर्वांच्याच घरी उपलब्ध असतो. कांद्याचा रस काढून थेट केसांवर अप्लाय करा. याव्यतिरिक्त तुम्ही नारळाच्या तेलात मिसळून कांद्याचा रस लावू शकता.  हे तेल लावल्यानंतर जवळपास १ ते २ तासांनी केस धुवून टाका. यामुळे अधिक दिवस काळे राहण्यास मदत होईल.

Web Title: How to make White Hair Black Permanently : Home remedies to get black hairs in 5 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.