प्रत्येक व्यक्तिगणिक केसांचा रंग, पोत, प्रकार आणि ठेवण वेगवेगळी असते. कुणाचे केस संपूर्ण कुरळे तर काहींचे पूर्ण प्लेन असतात. कुरळे केस जितके आकर्षक दिसतात, तितकेच ते हाताळणे कठीण असते. सर्व प्रकारच्या केसांची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु कुरळ्या केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. कुरळे केस शक्यतो जाड, रुक्ष आणि कोरडे असतात. असे केस मधून तुटण्याची शक्यता खूप असते. केसांच्या कुठल्या प्रकारची जास्त काळजी घ्यावी लागत असेल तर ते आहेत कुरळे केस.
सौंदर्याच्या दृष्टीने केसांची अतिशय काळजी घेणे महत्वाचे असते. केस गळणे, केसांत कोंडा होणे, अकाली पांढरे होणे, केस तुटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस निकृष्ठ बनतात, गळतात, निस्तेजही होतात. केसांच्या समस्येने आजकाल अनेक स्त्री, पुरुष ग्रासले आहेत. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा जरी बदल केला तरी केसांच्या सर्व समस्येचे निरसन होते. उन्हाळ्यांत कुरळ्या केसांची काळजी घेणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. उन्हाळ्यांत कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स समजून घेऊयात(How to make your curly hair smoother, healthier and frizz-free in summer season).
उन्हाळ्यांत कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करावं ?
१. सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करावा :- कुरळ्या केसांसाठीच असे नाही परंतु कोणत्याही प्रकारांतील केसांसाठी कायम सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करावा. कारण ही रसायने केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकतात, ज्यामुळे केसांना कोरडेपणा आणि कुरकुरीतपणा येतो. परंतु सल्फेट युक्त शॅम्पूचा अधिक वापर केल्याने कुरळे केस आणखीनच जास्त कोरडे होण्याची शक्यता असते, म्हणून सल्फेट मुक्त शॅम्पूचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून कुरळ्या केसांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल. शक्यतो कुरळ्या केसांसाठी डिझाइन केलेले सौम्य शॅम्पू निवडा.
२. वेळच्या वेळी कंडिशनर करत रहा :- कुरळे केस असलेल्या मंडळींनी केस कंडिशनिंग करणे अतिशय महत्त्वाचे असते. कुरळे केस सरळ केसांपेक्षा कोरडे असतात, याचा अर्थ त्यांना जास्त ओलावा लागतो. यासाठी नियमितपणे चांगल्या दर्जाचे कंडिशनर वापरल्यास केसांना हायड्रेटेड आणि फ्रिज फ्री ठेवण्यास मदत होते. शक्यतो कुरळ्या केसांसाठी डिझाइन केलेले कंडिशनर वापरावे. हे आपले कर्ल जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करते.
३. रुंद दातांचा कंगवा वापरा :- कुरळ्या केसांची निगा राखताना योग्य कंगवा निवडणे गरजेचे असते. बहुतांश स्त्री - पुरुष इथेच मोठी चूक करतात. कुरळ्या केसांसाठी रुंद दातांचा कंगवा वापरावा. कुरळ्या केसांसाठी कधीही हेयर ब्रशचा वापर करु नका. कंगवा वापरताना तो मोठ्या दातांचा आहे याची खात्री करुन घ्यावी.
४. मॉइश्चरायझिंग उत्पादने वापरा :- कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी कर्ल मॉइश्चरायझ वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे. कुरळे केस सहज कोरडे पडतात. त्यामुळे हेअर जेल, वॅक्स किंवा हेअरस्प्रेपासून दूर राहा. या उत्पादनांमुळे तुमचे केस चमकदार आणि मॉइश्चरायझ दिसतील. पण ते तितकेच कोरडेही पडतील. ही उत्पादने वापरण्यापेक्षा कुरळ्या केसांसाठी हेअर क्रिमचा वापर करावा.
५. केसांना तेल लावावे :- कुरळे केस असलेल्यांनी केस वारंवार नैसर्गितरीत्या कंडिशनिंग करणे अतिशय महत्त्वाचे असते. आपले केस लहान आणि कुरळे असल्यास केसांना किमान आठवड्यातील दोन दिवस तेलाने मालिश करुन कंडिशनिंग करावे. कुरळ्या केसांचा कोरडेपणा लक्षात घेऊन तेलाचा वापर करावा.
रिबॉन्डिंग केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी? ६ सोप्या टिप्स, हेयर रिबॉन्डिंग केसांवर टिकून राहील...