लांबसडक, दाट केस मिळणं सध्या खूपच कठीण झालंय. वातावरणातील बदल, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. (Hair Care Tips) जर स्ट्रेसफूल लाईफ असेल तरीही खूप केस गळतात. तेल, शॅम्पू बदलण्यात बरेच पैसे जातात पण हवा तसा बदल दिसत नाही. केस गळणं कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. केसांच्या वाढीसाठी स्प्रे बनवण्याची सोपी पद्धत पाहूया, (How to stop Hair Fall)
साहित्य
तांदूळ - १/२ कप
मेथी - १ टीस्पून
लिंबाची साल
लॅव्हेंडर तेल - 2 ते 3 थेंब
1) सगळ्यात आधी एका बरणीत पाणी घालून त्यात तांदूळ आणि मेथी भिजवायला ठेवा. त्यात ताज्या लिंबाची सालं घाला. त्यानंतर हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटल मध्ये गाळून घ्या. (How to Make Your Hair Grow Faster and Stronger)
2) या पाण्याचा स्प्रे केसांवर वापरून केस काहीवेळ तसेच ठेवा त्यानंतर शॅम्पू आणि कंडीशनरनं केस स्वच्छ धुवा. या उपायानं केसांवरचा कोंडा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय केस गळण्यावर नियंत्रण राहील.