Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...

हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...

How To Make Lipstick Stay Longer Just Do These Simple Thing Before Applying During Winters : How to Make Your Lipstick Last Longer During Winters : How to Make Your Lipstick Last, 4 Lip Hacks : थंडीच्या दिवसांत कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावता येत नसेल तर हे उपाय नक्की करून पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2024 06:22 PM2024-12-04T18:22:13+5:302024-12-04T18:43:10+5:30

How To Make Lipstick Stay Longer Just Do These Simple Thing Before Applying During Winters : How to Make Your Lipstick Last Longer During Winters : How to Make Your Lipstick Last, 4 Lip Hacks : थंडीच्या दिवसांत कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावता येत नसेल तर हे उपाय नक्की करून पहा...

How to Make Your Lipstick Last Longer During Winters How To Make Lipstick Stay Longer Just Do These Simple Thing Before Applying During Winters | हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...

हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...

आपल्यापैकी बऱ्याचजणी संपूर्ण मेकअप केला नाही तरी किमान ओठांवर लिपस्टिक तरी नक्की लावतात. परंतु हिवाळयात हिवाळ्यात ओठ फाटतात, कोरडे पडतात, ओठांच्या त्वचेचे पोपडे निघतात, ओठांना चिरा पडून रक्त यायला लागतं. या समस्यांमुळे ओठांचं सौंदर्य बिघडतं. याकडे दुर्लक्ष केल्यास ओठांची त्वचा खराब होते, ओठ काळे पडतात. हिवाळ्यात अशा फुटलेल्या ओठांवर कितीही ब्रँडेड किंवा महागडी लिपस्टिक लावली तरीही ती चांगली दिसत नाही(How to Make Your Lipstick Last Longer During Winters).

ओठांना लिपस्टिक लावली, की फुटलेल्या ओठांची समस्या झाकली जाईल असा समज करुन याकडे दुर्लक्ष करण्याची सवयही अनेकांना असते. पण लिपस्टिक लावून खराब ओठ झाकले जात नाही उलट ते आणखी खराब होतात. अशा परिस्थितीत, नेमके काय करावे हे समजत नाही. हिवाळ्यात वातावरणातील गारव्याने ओठ कोरडे पडतात, अशा कोरड्या ओठांवर (How To Make Lipstick Stay Longer Just Do These Simple Thing Before Applying During Winters) नीट लिपस्टिक लावता येत नाही. याचबरोबर लिपस्टिक लावली तरी ती ड्रायनेसमुळे फार काळ ओठांवर टिकून राहत नाही. यासाठीच हिवाळ्यात कोरड्या ओठांवर जर लिपस्टिक लावायची असेल किंवा ती दीर्घकाळ ओठांवर राहावी, यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात.  

हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिक टिकून राहत नाही... 

१. लिप स्क्रब करा :- हिवाळ्यात ओठांची त्वचा कोरडी पडून त्वेचेला एक प्रकारचा ड्रायनेस येतो. या ड्रायनेसमुळे आपल्या ओठांवर डेड स्किन जमा होऊ लागते. अशावेळी, ओठांवरील डेड स्किन घालवण्यासाठी लिप स्क्रब करा. यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये मध आणि साखर घेऊन हे एकत्रित मिश्रण बोटांवर घेऊन ओठांना लावून हलकेच मालिश करुन घ्यावे. यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाऊन ओठांना मऊपणा येतो. यामुळेच हिवाळ्यात देखील ओठांवर लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहते.  

२. लिप बाम लावा :- लिपस्टिक लावण्यापूर्वी नेहमी लिप बाम लावा. हे ओठांना हायड्रेट करते आणि त्यांना कोरडे होण्यापासून थांबवते. लिप बामचा पातळ थर ओठांना मऊ ठेवतो आणि लिपस्टिक जास्त काळ टिकण्यास मदत करतो.

लग्न ठरलंय आणि चेहऱ्यावर चमचमता ग्लो हवाय? खा हिवाळ्यातले ५ सुपरफूड, चेहरा चमकेल सोन्यासारखा...

३. लिप लायनरचा वापर करा :- हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लावलेली लिपस्टिक पसरु नये म्हणून लिप लायनरचा वापर करावा. जेव्हा तुम्ही लिपस्टिक ओठांवर लावण्यापूर्वी लिप लायनरचा वापर करता तेव्हा लिपस्टिक न पसरता दीर्घकाळ ओठांवर आहे तशीच टिकून राहते. 

४. हिवाळ्यात लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत :- लिपस्टिक लावताना दोन कोट लावा. पण ते कोट लावण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जो हवा तो कोट ओठांवर लावून घ्या. यानंतर दोन्ही ओठांमध्ये टिशू पेपर ठेवा आणि दोन्ही ओठांनी त्यावर दाब द्या. यामुळे अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल. आता असं केल्यानंतर पुन्हा एकदा लिपस्टिकचा एक कोट ओठांवर द्या. असं केल्यामुळे लिपस्टिक ओठांवर व्यवस्थित सेट होते आणि अधिक काळ टिकते.

हिवाळ्यात नखं वारंवार तुटतात, त्वचा कोरडी पडते? ५ टिप्स, नखं तुटणार नाहीत आणि...

Web Title: How to Make Your Lipstick Last Longer During Winters How To Make Lipstick Stay Longer Just Do These Simple Thing Before Applying During Winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.