Join us  

रात्री झोपताना चेहऱ्याला या ३ पैकी एका तेलाने मालिश करा, सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 5:00 PM

How to make your skin glow overnight चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी ३ तेल मसाज

पावसाळ्यात आरोग्यासह मुख्यतः स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला असे वाटते, की तिची स्किन ही ग्लोइंग, नितळ व चमकदार दिसावी. परंतु, धावपळीच्या दिवसात स्किनची योग्य काळजी घेणं काहींना जमतं तर काहींना जमत नाही. पावसाळ्यात स्किनवर बुरशी येणे, स्किन तेलकट होणे, स्किनवर पुरळ उठणे, या समस्या छळतात. यामुळे त्वचेची चमक कुठेतरी कमी होते.

स्किनवरील डाग घालवण्यासाठी यासह, स्किनवर नितळ तेज आणण्यासाठी, चेहऱ्यावरवर रात्रीच्या वेळी या ३ तेलांचा वापर करून पाहा. या उपायामुळे स्किनवर नैसर्गिक ग्लो येईल(How to make your skin glow overnight).

खोबरेल तेल

खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेवर मॉइश्चरायजरसारखे काम करते. यासह स्किन हायड्रेट ठेवते. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून मसाज करा. नियमित असे केल्याने त्वचेचा पोत सुधारतो, यासह मुरुमांचे डागही कमी होतात.

रात्री केस मोकळे सोडून झोपावे की बांधून? केस मोकळे सोडले तर काय बिघडते..

बदाम तेल

बदामाचे तेल चेहऱ्यावर औषधासारखे काम करते. बदाम तेल, जीवनसत्त्वे ए, बी आणि ईने समृद्ध आहे. चेहऱ्यावर रात्रीच्या वेळी बदामाचे तेल लावून मसाज केल्याने, त्वचा उजळते व डागही कमी होतात.

एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर

ऑलिव्ह ऑईल

चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावण्याचे देखील अनेक फायदे आहेत. या तेलामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि नैसर्गिक फॅटी ऍसिड असतात. सेंसिटिव्ह स्किनसाठी हे तेल खूप उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावून मसाज केल्याने सुरकुत्या कमी होतात, यासह चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी