Join us  

केसांची वाढ खुंटली ? करा ५ सोप्या स्टेप्समध्ये मसाज, केसांच्या वाढीत होईल मदत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 7:51 PM

5 massage steps to make your hair grow faster : दाट, मजबूत आणि लांबसडक केसांसाठी मसाज करणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे आपले केस निरोगी व चमकदार राहण्यास मदत मिळते....

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे आपण रोजच्या रुटीनमधील काही गोष्टी करणे टाळतो. आहार, चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांची अयोग्य काळजी यामुळेही केसांची वाढ थांबते, शिवाय केसांसबंधी अनेक समस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत आपण रोजच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करून केसांची योग्य ती काळजी घेऊ शकता. काही कारणास्तव जर आपल्या (Scalp Massage Techniques: How to Give Yourself a Soothing Head Massage) केसांची वाढ खुंटली असेल तर केसांची काळजी घेण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. ज्यामुळे आपल्या केसांना आतून पोषण मिळतेच शिवाय केसांची वाढ देखील झपाट्याने होईल(Scalp Massage Help Your Hair Grow).

केसांची काळजी यासाठी आपण कित्येक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो. केसांना घनदाट, चमकदार व कोमल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काही कालावधीसाठी (HOW A SCALP MASSAGE FACILITATES HAIR GROWTH) आपण हे करू शकतो. पण, त्यानंतर केसांचं नुकसान होते. काहीवेळा तर आपण बाजारांत विकत मिळणारे महागडे प्रॉडक्ट्स देखील मागवतो. या बहुतेक प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. हे केसांसाठी खूप हानिकारक असतात. याचा केसांच्या वाढीवर दुष्परिणाम (scalp massages stimulate hair growth) होतो. यासाठी आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी घरच्या घरी सोप्या ५ स्टेप्समध्ये हेअर मसाज (Scalp Massage For Hair Growth) करु शकतो. यामुळे आपल्या केसांच्या वाढीत खूप मदत मिळते(How To Massage Your Scalp For Hair Growth & Other Benefits).

केस वाढवण्यासाठी सोप्या ५ स्टेप्समध्ये करा हेअर मसाज... 

१. हेअर मसाजची सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्या हातांच्या बोटांनी कपाळापासून सुरुवात करत संपूर्ण टाळूवर टॅप करत राहावे. बोटांनी हलकेच स्कॅल्पवर २ ते ३ मिनिटे टॅप करुन घ्यावे. 

२. त्यानंतर आपल्या हातांची बोट कपाळापासून सुरुवात करुन केस मागच्या दिशेने फिरवले जातील अशाप्रकारे केसात हात घालून मसाज करून घ्यावा. (असे किमान १० ते १५ वेळा करत राहावे) आपल्या हातांनी केस मागच्या दिशेने फिरवताना हलक्या हाताने स्कॅल्पवर घर्षण करावे. यामुळे स्कॅल्पच्या त्वेचेचे ब्लड सर्क्युलेशन वाढते. तसेच आता उलट बाजूने म्हणजेच, आपल्या मानेच्या मागच्या बाजूने मसाज करत वर टाळूपर्यंत हलक्या हाताने मसाज करत राहावे. मानेपासूनवर हलक्या हाताने स्कॅल्पवर २ ते ३ मिनिटे मसाज करत राहावा. 

केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

३. त्यानंतर केसांचा भांग पाडून केसांचे दोन भागांत विभाजन करुन घ्यावे. आता केसांच्या मुळांना आपल्या मुठीत धरुन हलकेच केसांची मूळ हाताने २ ते ३ मिनिटे ओढावीत. 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

४. दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करुन आपण ज्या प्रमाणे केसांना तेल लावतो त्याचप्रमाणे केसांना हलकेच मसाज करुन घ्यावा. असे केल्याने स्कॅल्पमध्ये असणाऱ्या पेशी व ऊतींना आराम मिळतो व त्यांच्या कार्यात सुधारणा होते. 

५. डोक्याच्या बरोबर मध्यभागी असणाऱ्या २ मार्मा पॉइंट्सना हलक्या बोटांनी प्रेस करुन मसाज करावा.(व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे)

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

केसांचं आरोग्य टाळूच्या त्वचेवर अवलंबून असते. टाळूची त्वचा निरोगी असेल तर आपले केस सुंदर आणि मजबूत राहतात. घनदाट, मजबूत, सुंदर, लांबसडक आणि चमकदार केस आपल्याला हवे असल्यास आपल्या टाळूच्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करावा. टाळूला वेळच्यावेळी तेलाने मसाज केल्याने तेलातील पोषक तत्त्वांचा केसांच्या मुळांना खोलवर पुरवठा होतो. टाळूला व स्कॅल्पला मसाज केल्याने त्वचा मॉइश्चराइज होते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स