Join us  

कंबरेपर्यंत लांब-सुंदर केस हवे? फक्त ३० मिनिटं 'या' तेलाने मसाज करा, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 6:52 PM

How to oil your hair effectively at home : कोंडा होईल कमी, केस गळतीही थांबेल, फक्त केसांना तेल लावण्याची-शाम्पूने आंघोळ करण्याची पद्धत पाहा..

केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे, या समस्यांमुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. धूळ, माती, प्रदूषण, योग्य आहाराचे सेवन न करणे, यामुळे केसांच्या निगडीत समस्या वाढत जातात. अनेक लोकं यावर विविध उपाय करून पाहतात. केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करून पाहतात. पण यामुळे केस आणखीन खराब होतात.

प्रत्येकाचा केसांचा पोत हा वेगळा असतो. त्यामुळे आपल्या केसांसाठी कोणते तेल आणि शाम्पू योग्य राहील याची माहिती आपल्याला असायला हवी. जर आपल्याला लांबसडक, काळेभोर, दाट केस हवे असतील तर, डॉक्टर अमित बांगिया यांनी सांगितलेल्या उपायांना फॉलो करून पाहा. यामुळे केसात कोंडा, केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळेल(How to oil your hair effectively at home).

केस लांब, काळे आणि दाट होण्यासाठी कोणते तेल वापरावे?

डॉ.बंगिया यांच्या मते, 'केसांवर तेलाचा कमी वापर करावा. कारण आपले शरीर स्वतः तेल तयार करते, अनेकदा स्काल्पवर ते तेल दिसूनही येते. जर आपल्याला केसांवर तेल लावायचे असेल तर, आर्गन ऑइलचा वापर करून पाहा. आर्गन ऑइलमुळे स्काल्प मॉइश्चरायज होते. शिवाय त्यात अँटी-मायक्रोबियल एजंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स गुणधर्म आढळतात. ज्याचा फायदा केसांना अधिक होतो.

दिवाळीत चेहऱ्यावर हवाय स्पेशल ग्लो? मग १ बटाटा घ्या, पाहा सोपा उपाय- चेहऱ्यावर येईल चमक

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलचा वापर आपण त्वचेसह केसांसाठी देखील करू शकता. टी ट्री ऑइलचा वापर थेट स्काल्पवर करणं टाळा. केसांवर टी ट्री ऑइल लावण्यापुर्वी त्यात खोबरेल तेल किंवा जोजोबा तेल मिसळा. त्यानंतरच केसांवर लावा. केसांवर तेल लावण्याच्या अर्धा तासानंतरच आंघोळ करा.

टी ट्री ऑइल व्यतिरिक्त कोणते तेल वापरावे?

जर आपल्याकडे टी ट्री ऑइल नसेल तर, आपण खोबरेल तेल, लॅव्हेंडर तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. या तेलांचा वापर केल्याने केस घनदाट होतात. शिवाय केसगळतीही थांबते.

काखेतला काळेपणा वाढला, स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? ५ रुपयांच्या तुरटीचे २ भन्नाट उपाय, त्वचा उजळेल

कोंड्याच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, केसांवर शाम्पूचा वापर किती वेळा करावा?

अनेक लोकं कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त आहेत. जर आपण देखील असाल तर, केसांवर आठवड्यातून ३ वेळा शाम्पू लावा, व कोमट पाण्याने केस धुवा. शिवाय शाम्पूमध्ये केटोकोनाझोल, झिंक पायरिथिओन, सेलेनियम सल्फाइड घटक आढळतात का हे पाहा. यामुळे केसातून कोंडा क्लिन होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स