प्रत्येकाला आपले केस काळे, जाड, लांब आणि चमकदार दिसावे असे वाटते. पण केसांची योग्य निगा न राखल्यामुळे ते आणखी खराब होतात. सध्या हिवाळा सुरु झालाय. त्यामुळे केसांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. केसांची निगा राखताना अनेक जण महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात.
मात्र, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा फक्त तेल आणि योग्य शाम्पूचा वापर करून पाहा. यामुळे केस हेल्दी आणि शाईनी होतील. पण अनेकांना तेल लावण्याची योग्य पद्धत ठाऊक नसते. केसांना तेल कधी, कसे आणि केव्हा लावावे हे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. कारण योग्य तेलामुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे केसांवर तेलाचा वापर कसा करावा पाहा(How To Oil Your Hair The Right Way).
केसांना किती वेळा तेल लावावे
केसांना किती वेळ तेल लावावे, हे आपल्या केसांवर अवलंबून असते. आपण आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तेल लावू शकता. मात्र, तेल न लावता केस धुण्याची चूक शक्यतो टाळा.
केसांना तेल कधी लावावे?
ज्यांचे केस कोरडे आहेत, त्यांनी आठवड्यातून दोन वेळा तेल लावून मालिश करावे. केस धुण्याआधी किमान एक तास आधी तेल लावावे. यामुळे स्काल्पवर साचलेली घाण, धूळ, घाम तेलामुळे निघून जाईल. शिवाय शाम्पू केल्यानंतर स्काल्प देखील क्लिन होईल. ज्यांचे स्काल्प चिकट-चिपचिपीत आहे, त्यांनी कमी प्रमाणात तेल लावावे. तेलाऐवजी आपण क्लेरिफाइंग शाम्पूचा वापर करू शकता.
साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो
केसांना तेल लावण्याचे फायदे
तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे केसांना फक्त मजबुती मिळत नसून, स्प्लिट एंड्सची समस्याही सुटते. त्यामुळे आठवड्यातून २ वेळा केसांवर तेल लावायलाच हवे. यामुळे केस निरोगी होतात. दरम्यान, खोबरेल तेलाशिवाय केसांना आपण इतर तेल लावत असाल तर, डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या.