Join us

५ रुपयांची तुरटी चेहऱ्यावर करेल कमाल! पिंपल्स, ॲक्ने जाऊन काही दिवसांतच त्वचा होईल स्वच्छ- सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 09:20 IST

Skin Care Treatment Using Phitkari or Turati: त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी तुरटीचा वापर कशा पद्धतीने करता येतो ते पाहूया..(how to phitkari or alum for glowing skin?)

ठळक मुद्देआठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. त्वचा सैलसर पडून त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण बरंच कमी होईल. 

गढूळ झालेलं पाणी स्वच्छ करण्यासाठी जसा तुरटीचा उपयोग होतो तसाच आपली त्वचा स्वच्छ, नितळ, सुंदर व्हावी यासाठीही तुरटी वापरता येते. हल्ली वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्समध्ये तुरटीचा वापर करण्याचा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देत आहेत. स्वस्तात मिळणारी तुरटी जर योग्य पद्धतीने चेहऱ्यावर लावली गेली तर त्वचेचं सौंदर्य खुलू शकतं, पिगमेंटेशन, ॲक्ने, पिंपल्स, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठीही तुरटीचा उपयाेग होऊ शकतो, असं ब्यूटीशियन सांगतात ( use of phitkari for reducing dark spots, pigmentation, pimples and acne). त्यासाठी तुरटीचा वापर नेमका कशा पद्धतीने करायचा ते पाहूया..(how to phitkari or alum for glowing skin?) 

 

त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा?

१. त्वचेवरचे पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी तुरटीचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो. यासाठी १ टीस्पून एवढी तुरटी घ्या. त्यामध्ये त्याच्या दुप्पट हळद टाका.

Pearl Ring Designs: रोजच्या वापरासाठी सुंदर नाजुक मोत्याची अंगठी, हाताचं सौंदर्य खुलविणाऱ्या १० डिझाईन्स

हे मिश्रण गुलाब पाण्यात कालवा आणि त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुताना कोणतंही फेसवॉश, साबण वापरू नका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावर खूप छान परिणाम दिसून येईल.

 

२. त्वचेचा घट्टपणा टिकवून राहण्यासाठीही तुरटी उपयुक्त ठरते. यासाठी अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. त्या पाण्यात तुरटी पावडर टाका. तुरटी पावडर पाण्यात पुर्णपणे विरघळेपर्यंत पाणी हलवत राहा.

२०२४ मध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या किचन टिप्स! सांगा तुम्हाला यापैकी किती माहिती आहेत

यानंतर पाणी जेव्हा थंड होईल तेव्हाा त्यात एक ते दोन चमचे गुलाब पाणी आणि ८ ते १० थेंब ग्लिसरीन टाका. सगळं व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्यापुर्वी हा स्प्रे चेहऱ्यावर मारा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. त्वचा सैलसर पडून त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण बरंच कमी होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी