Lokmat Sakhi >Beauty > Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

How To Protect Skin From Holi Colours: रंग तर खेळायचा असतो (Holi celebration 2024), पण त्वचेचं नुकसान होण्याची भीती वाटते. तुमचंही असंच झालं असेल तर रंग खेळण्यापुर्वी फक्त ३ गोष्टी करा. (How to take care of skin before playing holi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 06:04 PM2024-03-22T18:04:21+5:302024-03-22T18:07:47+5:30

How To Protect Skin From Holi Colours: रंग तर खेळायचा असतो (Holi celebration 2024), पण त्वचेचं नुकसान होण्याची भीती वाटते. तुमचंही असंच झालं असेल तर रंग खेळण्यापुर्वी फक्त ३ गोष्टी करा. (How to take care of skin before playing holi)

How to prepare your skin for holi colours, skin care tips for holi, How to take care of skin before playing holi, how to protect skin from colours | Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

Highlightsरंग खेळताना दर अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाकायला विसरू नका. यामुळे चेहऱ्यावर लागलेला रंग जास्त पक्का होण्यापुर्वीच निघून जाईल.

रंगांची मनसोक्त उधळण करण्याचा होळीचा म्हणजेच धुलीवंदनाचा सण आता अवघ्या एक- दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे यंदा रंगांचा आनंद कसा घ्यायचा, याचं अनेकांचं प्लॅनिंगही सुरु झालं असणार (Holi celebration 2024). रंग तर खूप खेळायचा आहे, अगदी धमाल करायची आहे. पण त्याचवेळी त्वचेची मात्र काळजी वाटते, अशा मनस्थितीत सध्या अनेकजणी आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी या काही खास टिप्स (How to prepare your skin for holi colours). रंग खेळण्यापुर्वी या काही गोष्टी आवर्जून करा (skin care tips for holi). यामुळे रंग खेळाला तरी त्वचेचं कोणतंही नुकसान होणार नाही (how to protect skin from colours) आणि तुम्हालाही वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणाचा मनमुराद आनंद घेता येईल. (How to take care of skin before playing holi)

रंग खेळण्यापुर्वी त्वचेची कशी काळजी घ्यावी?

 

१. मॉईश्चरायझर

कोणत्याही रंगाचा तुमच्या त्वचेशी थेट संपर्क येऊ नये म्हणून त्वचा मॉईश्चराईज असणं खूप गरजेचं आहे.

प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

त्यामुळे रंग खेळायला सुरुवात करण्यापुर्वी तुमच्या त्वचेला व्यवस्थित माॅईश्चराईज करा. त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला तरी चालेल.

 

२. सनस्क्रिन

रंग खेळण्यापुर्वी त्वचा मॉईश्चराईज केल्यानंतर त्यावर सनस्क्रिन लावा.

केस खूप गळतात- पांढरे झाले? केमिकल्सचे शाम्पू वापरणं सोडा आणि 'हा' नॅचरल शाम्पू लावून पाहा

तुम्ही रंग खेळण्यसाठी घराबाहेर जेव्हा जाणार असाल त्याच्या १० ते १५ मिनिटे आधी त्वचेवर व्यवस्थित सनस्क्रिन लावून घ्या. यामुळे त्वचेवर रंग आणि ऊन या दोन्हींचाही परिणाम होणार नाही. 

 

३. मेकअप

मेकअप करून कोणी रंग खेळायला जात नाही. पण तुम्ही जर मेकअप करून रंग खेळायला गेलात, तर याचा फायदा तुमच्या त्वचेलाच होईल. कारण मेकअप करताना आपल्या त्वचेवर कॉस्मेटिक्सच्या ३- ४ लेयर्स तयार होतात. त्यामुळे कोणी जर रंग लावला तर तो थेट आपल्या त्वचेला लागत नाही. मेकअपमुळे रंगांपासून त्वचेचं संरक्षण होतं.

लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत

हे देखील लक्षात घ्या..

रंग खेळताना दर अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाकायला विसरू नका. यामुळे चेहऱ्यावर लागलेला रंग जास्त पक्का होण्यापुर्वीच निघून जाईल.

तसेच रंग खेळताना ऊन्हात जास्त वेळ उभं राहाणं टाळा. शक्यतो सावलीतच उभे राहा.

रंग खेळतान पुर्ण बाह्यांचे जाडसर कपडे घाला. यामुळेही त्वचा सुरक्षित राहील. 

 

Web Title: How to prepare your skin for holi colours, skin care tips for holi, How to take care of skin before playing holi, how to protect skin from colours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.