Lokmat Sakhi >Beauty > How to Prevent Acne : चांगल्या चेहऱ्याला खराब करतात ५ चुका,  ग्लोईंग स्किनसाठी या घ्या सोप्या स्किन केअर टिप्स

How to Prevent Acne : चांगल्या चेहऱ्याला खराब करतात ५ चुका,  ग्लोईंग स्किनसाठी या घ्या सोप्या स्किन केअर टिप्स

How to Prevent Acne : रोजच्या स्किन केअर रुटिनमध्ये ७ बदल करून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:41 PM2022-11-17T15:41:07+5:302022-11-17T15:48:31+5:30

How to Prevent Acne : रोजच्या स्किन केअर रुटिनमध्ये ७ बदल करून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता

How to Prevent Acne : 7 Mistake you must avoid while concealing your pimples  | How to Prevent Acne : चांगल्या चेहऱ्याला खराब करतात ५ चुका,  ग्लोईंग स्किनसाठी या घ्या सोप्या स्किन केअर टिप्स

How to Prevent Acne : चांगल्या चेहऱ्याला खराब करतात ५ चुका,  ग्लोईंग स्किनसाठी या घ्या सोप्या स्किन केअर टिप्स

पिंपल्स, डार्क स्पॉट्स महिलांमध्ये जाणवणारी सगळ्यात कॉमन समस्या आहे. ही लहान वाटणारी  समस्या तुमचा पूर्ण दिवस खराब करू शकतात. पिंपल्समुळे त्वचेवर काळे डाग येतात. (Skin Care Tips)  डागांमुळे चेहरा खूपच खराब दिसतो.  यामुळे आत्मविश्वास कमी होतो. फिरायला जाणं असो किंवा कोणाचं लग्न चेहरा ग्लोईंग दिसायला हवा असं प्रत्येकालाच वाटतं.   रोजच्या स्किन केअर रुटिनमध्ये ७ बदल करून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता.  या चुका टाळल्यानं तुमच्या त्वचेवर पुळ्याही येणार नाहीत. (7 Mistake you must avoid while concealing your pimples)

१)  खूप मुली ही चूक करतात. नेहमी कंसीलर लाईट शेडचं न निवडता  त्वचेच्या रंगाशी मिळतं  जुळतं असायला हवं. अन्यथा तुम्हाला जे डाग लपवायचे आहेत ते जास्त उठून दिसतील. 

२) जेव्हा तुम्ही डाग लपवण्याचे प्रयत्न करता तेव्हा याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे त्वचेला एक्सफ्लोयेलट करणं. तुम्ही ही स्टेप टाळतील तर कंन्सिलर फक्त वरच्या त्वचेवर लागलेले डाग काढून टाकेल आणि त्वचा व्यवस्थित दिसणार नाही.

३) लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते त्यांचे मुरुम झाकण्याचा प्रयत्न करताना ते पुळ्या फोडतात. यामुळे जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेवर डाग येऊ शकतात.

४) तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे कन्सीलर लावण्यापूर्वी स्त्रिया प्राइमर वापरत नाहीत, कारण प्राइमरमध्ये तुमचे कन्सीलर धरून ठेवण्याची क्षमता असते. म्हणून चेहऱ्याला आधी मॉईश्चरायजर आणि नंतर प्रायमर लावून मेकअपला सुरूवात करा.

५)  डाग झाकण्याचा प्रश्न येतो तेव्हा, योग्य साधने निवडणे फार महत्वाचे आहे. मुरुम-प्रवण त्वचेसाठी, आपण दाट ब्रिस्टल्ससह बफिंग ब्रश निवडावा. ब्लेंडिंग स्पंज किंवा  इतर कोणत्याही ब्रशमुळे डाग येऊ शकतात.

६) लोक फाउंडेशन लावण्यापूर्वी कन्सीलर लावतात, पण चांगल्या त्वचेसाठी बेस लावल्यानंतर थोडावेळ तसेच राहूद्या. त्यानंतर  कन्सिलर लावा. यामुळे तुमच्या त्वचेला ग्लोईंग  लूक मिळेल. 

७) जास्त कंसीलर लावल्याने देखील तुमचे पिंपल्स उठून दिसतात. म्हणून आवश्यक तेवढेच कंसीलर लावावे.  जेणेकरून चेहरा खराब दिसत नाही. 

Web Title: How to Prevent Acne : 7 Mistake you must avoid while concealing your pimples 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.