Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर खूप पुरळ आहे, कमीच होत नाही? आहारात घ्या ४ गोष्टी, पुरळ कमी होऊन चेहरा दिसेल सुंदर

चेहऱ्यावर खूप पुरळ आहे, कमीच होत नाही? आहारात घ्या ४ गोष्टी, पुरळ कमी होऊन चेहरा दिसेल सुंदर

How To Prevent Acne Skin Care Diet Tips : उत्तम त्वचा आणि आरोग्यासाठी आहारात कोणत्या घटकांचा समावेश केल्यास पुरळांची समस्या कमी होऊ शकते याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 01:40 PM2022-12-30T13:40:47+5:302022-12-30T14:09:02+5:30

How To Prevent Acne Skin Care Diet Tips : उत्तम त्वचा आणि आरोग्यासाठी आहारात कोणत्या घटकांचा समावेश केल्यास पुरळांची समस्या कमी होऊ शकते याविषयी...

How To Prevent Acne Skin Care Diet Tips : Take 4 things in your diet to reduce acne on your face, your face will look smooth and beautiful forever | चेहऱ्यावर खूप पुरळ आहे, कमीच होत नाही? आहारात घ्या ४ गोष्टी, पुरळ कमी होऊन चेहरा दिसेल सुंदर

चेहऱ्यावर खूप पुरळ आहे, कमीच होत नाही? आहारात घ्या ४ गोष्टी, पुरळ कमी होऊन चेहरा दिसेल सुंदर

Highlightsआहारातून चांगले पोषण मिळाले तर सौंदर्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते...चेहऱ्यावरचे पुरळ आणि फोड कमी झाले तर त्वचा नितळ, सुंदर दिसते

चेहऱ्यावर पुरळ येणे किंवा पिंपल्स येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. विविध कारणांनी आपल्या चेहऱ्यावर पुरळ येतात. त्यामागे कधी आरोग्याच्या तक्रारी कारणीभूत असतात तर कधी त्वचेच्या. आहारातून त्वचेचे योग्य पद्धतीने पोषण झाले नाही तरी चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स येतात. यामुळे आपल्या सौंदर्यात तर बाधा येतेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही अशाप्रकारे सतत पुरळ येणे किंवा पिंपल्स येणे चांगले नसते (How To Prevent Acne Skin Care Diet Tips). 

अशावेळी या समस्येचे नेमके कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करायला हवा. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी चेहऱ्यावर पुरळ येऊ नये आणि शरीराचे-त्वचेचे चांगले पोषण व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. आहारात साखर, प्रोसेस्ड फूड, जंक फूडचा समावेश करण्यासोबतच उत्तम त्वचा आणि आरोग्यासाठी आहारात कोणत्या घटकांचा समावेश केल्यास पुरळांची समस्या कमी होऊ शकते, पाहूयात..

(Image : Google)
(Image : Google)

१. व्हिटॅमिन ए

बेटा केरेटीन आणि रेटीन ए हे घटक असलेले पदार्थ आहारात योग्य प्रमाणात घेतले तर त्याचा त्वचा चांगली राहण्यास फायदा होतो. त्वचा नितळ आणि ग्लोईंग राहावी तसेच पुरळ कमी व्हावेत यासाठी आहारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी यांचा समावेश असायला हवा. 

२. झिंक 

हाही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त घटक असून त्वचेच्या समस्या दूर होण्यासाठी आहारात झिंकचा योग्य प्रमाणात समावेश हवा. विविध प्रकारते दाणे, शेंगा, भाज्या, फळे, मासे, डाळी यांमध्ये झिंक असते. 

३. बी कॉम्प्लेक्स

चेहऱ्यावर तेलकटपणा असेल तर त्यामुळे पुरळ किंवा फोड येतात. हा तेलकटपणा कमी करण्यासाठी बी कॉम्प्लेक्स अतिशय महत्त्वाचे असते. 

४. व्हिटॅमिन सी 

व्हिटॅमिन सी आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी आवश्यक असणारा घटक आहे. त्वचेच्या समस्यांबरोबरच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन सी फायदेशीर असते. आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी यांसारख्या आंबटवर्गीय फळांतून व्हिटॅमिन सी मिळत असल्याने या फळांचा आहारात समावेश ठेवायला हवा. 

 

 

Web Title: How To Prevent Acne Skin Care Diet Tips : Take 4 things in your diet to reduce acne on your face, your face will look smooth and beautiful forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.