Join us  

१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 7:39 PM

flaxseed and rice flour for skin : How to prevent aging sign & wrinkles by using rice & flax seeds : ऐन तिशीतच त्वचेवर दिसतात एजिंगच्या खुणा, वापरा होममेड अँटी - एजिंग मास्क...

साधारणपणे जसजसे आपले वय वाढत जाते तसा आपल्या त्वचेत बदल होताना दिसतो. वय वाढल्यावर त्वचेवर हळुहळु एजिंगच्या खुणा दिसू लागतात. परंतु सध्याच्या काळात कमी वयातच त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसण्याची समस्या खूपच कॉमन झाली आहे. त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा लूज पडणे, स्किन रिंकल्स येणे अशा एजिंगच्या अनेक समस्यांना काहीजणांना तरुणपणीच सामना करावा लागतो. तरुण असतानाच त्वचेवर एजिंगच्या अशा खुणा दिसू नये म्हणून आपण अनेक उपाय करून पाहतो(flaxseed and rice flour for skin).

महागड्या क्रिम्स, ब्यूटी ट्रिटमेंट्स यांसारख्या अनेक उपायांनी आपण त्वचेला सुंदर आणि तरुण ठेवू शकतो असे वाटते. परंतु या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या त्वचेवर फार काळ टिकत नाही. आजकाल कमी वयातच त्वचेवर बारीक खुणा, सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली आहेत. हे टाळण्यासाठी अशा गोष्टींचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करा, ज्यामुळे ते रोखण्यास मदत होईल. त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी आपण घरच्यांघरीच त्वचेसाठी फायदेशीर असा फेसमास्क बनवू शकतो. हा अँटी - एजिंग फेसमास्क नेमका कसा तयार करावा तसेच हा फेसमास्क त्वचेवर लावण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात( How to prevent aging sign & wrinkles by using rice & flax seeds).  

फेसमास्क बनवण्यासाठीचे साहित्य :-

१. अळशीच्या बिया - १ टेबलस्पून २. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून ३. पाणी - १ कप 

त्वचेच्या समस्या अनेक, प्रत्येक  त्रासप्रमाणे कोरफड जेलमध्ये मिक्स करा हे ४ पदार्थ, स्किन प्रॉब्लेम्स होतील दूर... 

फेसमास्क बनवण्याची कृती :- 

१. एक पॅन घेऊन तो मंद आचेवर ठेवून हलकासा गरम करून घ्यावा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात पाणी ओतून घ्यावे. २. पाणी गरम झाल्यावर त्यात अळशीच्या बिया आणि तांदुळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे. ३. आता पॅनमधील पेस्ट थोडी स्मूद झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. आता हे बॅटर एका बाऊलमध्ये काढून थोडे थंड करावे. ४. त्यानंतर ही तयार पेस्ट त्वचेवर लावून घ्यावी किमान १५ मिनिटे ही पेस्ट त्वचेवर लावून ठेवावी. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. ५. आपण हा फेसमास्क एकदाच बनवून ठेवू काचेच्या हवाबंद बाटलीत स्टोर करून ठेवू शकता. पुढचे ४ ते ५ दिवस आपण हा फेसमास्क वापरु शकता. 

गव्हाच्या पिठाच्या करा फेसपॅक, चपात्या लाटून होईतो स्किनवर येईल ग्लो!  स्किन प्रॉब्लेम्सवर नॅचरल उपाय... 

अळशीच्या बिया व तांदुळाचे पीठ त्वचेसाठी वापरण्याचे फायदे :-     

१. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वांचे प्रमाण हे अधिक असते. ज्यामुळे त्वचेची हरवलेली चमक, आणि एजिंगच्या खुणा, सुरकुत्या, रिंकल्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर आपण अळशीच्या बियांचा वापर त्वचेसाठी नियमित करत असाल तर त्वचेवरील एजिंगच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.  

२. आपल्या त्वचेसाठी तांदळाचे पीठ अत्यंत फायदेशीर असते. तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही वापरले जातात. तांदुळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर आहे. तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी