Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांखाली बारीक लाईन्स दिसू लागल्या? ५ उपाय; वय वाढीच्या खुणा, सुरकुत्या दिसणारच नाही

डोळ्यांखाली बारीक लाईन्स दिसू लागल्या? ५ उपाय; वय वाढीच्या खुणा, सुरकुत्या दिसणारच नाही

How to Prevent Fine Lines Under Your Eyes : सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे तुमची त्वचा तरूण आणि डागविरहीत दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 04:20 PM2023-08-14T16:20:50+5:302023-08-15T13:56:18+5:30

How to Prevent Fine Lines Under Your Eyes : सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे तुमची त्वचा तरूण आणि डागविरहीत दिसेल.

How to Prevent Fine Lines Under Your Eyes : 5 Ways to Remove Under Eye Wrinkles at Home | डोळ्यांखाली बारीक लाईन्स दिसू लागल्या? ५ उपाय; वय वाढीच्या खुणा, सुरकुत्या दिसणारच नाही

डोळ्यांखाली बारीक लाईन्स दिसू लागल्या? ५ उपाय; वय वाढीच्या खुणा, सुरकुत्या दिसणारच नाही

वाढत्या वयात त्वचेचं मॉईश्चर आणि नैसर्गिक चमक कमी होत जाते. अशा स्थितीत चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. अलिकडे वयाआधीच त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवत आहे. (Anti-Ageing Tips) ३० ते ५५ वर्षवयोगटातील महिलांमध्ये सुरकुत्या जास्त दिसून येतात. कमी वयात सुरकुत्या येण्याचं कारण व्यस्त जीवनशैली, ताण-तणाव, झोप पूर्ण न होणं आणि शरीरात पोषणाची कमतरता हे असू शकतं. (How to remove wrinkles)

अशावेळी महिला ब्यूटी प्रोडक्ट्ससचा वापर करतात. सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे तुमची त्वचा तरूण आणि डागविरहीत दिसेल. हे घरगुती उपाय कोणीही करू शकतं.  याचे साईड इफेक्ट्सही जाणवत नाहीत. (How to remove wrinkles under eyes)

बदामाचं तेल

बदामाच्या तेलाचे २ ते ३ थेंब रात्री चेहऱ्याला लावून मसाज करा आणि मग झोपा. बदामाचे तेल ओव्हर नाईट फेस मास्कप्रमाणे काम करते. तुम्हाला सकाळी याचा परिणाम दिसून येईल. नियमित असे केल्यानं त्वचेत बदल झालेला दिसून येईल आणि सुरकुत्या पूर्णपणे कमी होतील.

व्हिटामीन  ई टॅब्लेट

त्वचेवर सुरकुत्या यायला सुरूवात झाली असेल तर व्हिटामीन ई कॅप्सूल कापून चेहऱ्याला लावा. यातील द्रव पदार्थ संपूर्ण चेहऱ्याला लावण्यासाठी तुम्हाला ४ ते ५ कॅप्सूल्स लागतील. या तेलानं चेहऱ्यावर मसाज करा. रात्री झोपण्याआधी हा उपाय केल्यास त्वचेवर चांगला परिणाम दिसून येईल. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.

एलोवेरा

एलोवरातील औषधी गुणांमुळे याचा वापर त्वचा आणि केसांवर केला जातो. सुरकुत्या कमी करण्यासाठी एलोवेरा जेल हातात घेऊन  हलक्या हातानं चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचा चमकेल. नियमित एलोवेरा जेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात. 

फिश फेस पोज

या व्यायाामुळे गालाचे मसल्स टोन होतात. याशिवाय त्वचेचा लूजनेस कमी होतो. जर तुम्हाला लाफ लाईन्स समूद करायच्या असतील तर मॅन्युअल फेसलिफ्ट योगा करा. यामुळे चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि त्वचा हेल्दी, ग्लोईंग दिसते. 

चिक लिफ्ट

(Image Credit- faceyogarenew)

हा योगाप्रकार गळ्याजवळील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.  यामुळे गालांची चरबी कमी होते. फिलर्स आणि गळ्याचे मसल्स मजबूत करण्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे. नियमित हा व्यायाम केल्यानं फाईन लाईन्स रोखता येतात.

Web Title: How to Prevent Fine Lines Under Your Eyes : 5 Ways to Remove Under Eye Wrinkles at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.