Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांखालच्या सुरकुत्या कमी होतील झटपट, करा फक्त ५ गोष्टी! तरुण दिसण्याचं सिक्रेट

डोळ्यांखालच्या सुरकुत्या कमी होतील झटपट, करा फक्त ५ गोष्टी! तरुण दिसण्याचं सिक्रेट

How to Prevent Fine Lines Under Your Eyes : सतत मोबाईल, लॅपटॉप स्क्रीन बघितल्याने डोळ्यांखाली सुरकुत्या जाणवणं कॉमन आहे. (How to get rid of wrinkles under eye)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:30 AM2023-04-17T11:30:00+5:302023-04-18T12:29:24+5:30

How to Prevent Fine Lines Under Your Eyes : सतत मोबाईल, लॅपटॉप स्क्रीन बघितल्याने डोळ्यांखाली सुरकुत्या जाणवणं कॉमन आहे. (How to get rid of wrinkles under eye)

How to Prevent Fine Lines Under Your Eyes : Under eye wrinkles home remedy | डोळ्यांखालच्या सुरकुत्या कमी होतील झटपट, करा फक्त ५ गोष्टी! तरुण दिसण्याचं सिक्रेट

डोळ्यांखालच्या सुरकुत्या कमी होतील झटपट, करा फक्त ५ गोष्टी! तरुण दिसण्याचं सिक्रेट

सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात  आरोग्याच्या समस्यांसह त्वचेच्याही समस्या उद्भवतात. (Skin Care  Tips)  एकदा त्वचेच्या तक्रारी उद्भवायला लागल्या की सतत चेहऱ्यावर काहीना काही बदल जाणवत असतात. सतत मोबाईल, लॅपटॉप स्क्रीन बघितल्याने डोळ्यांखाली सुरकुत्या जाणवणं कॉमन आहे. (How to get rid of wrinkles under eye)

डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या जास्त प्रमाणात दिसायला लागल्या तर तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू शकता.  हे टाळण्यासाठी त्वचेची काळजी वेळीच घेणं गरजेचं आहे. प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊनच खर्च करायला हवा असं काही नाही. घराच्याघरी सोपं स्किन केअर रूटीन फॉलो करून तुम्ही सुरकुत्या तसंच इतर वय वाढीच्या खुणांना लांब ठेवू शकता. (How to Prevent Fine Lines Under Your Eyes)

१) दिवसाची सुरूवात करताना ताज्या पाण्यानं चेहरा धुवून लोशन लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. असं केल्यानं त्वचेला पोषण मिळतं. रात्री तुम्ही व्हिटामीन ई ची कॅप्सूल लावू शकता आणि सकाळी मॉईश्चरायजर लावा. यामुळे त्वचेला पोषण मिळेल. त्वचेला हेल्दी आणि रिंकल्स फ्री ठेवण्यासाठी रोज  हे रुटीन फॉलो करा. 

२) त्वचेला सुरकुत्यापासून मुक्त ठेवण्यासाठी दररोज कोणतेही एक फळ खा.  संपूर्ण पोषणासाठी, आठवड्यातून किमान 4 ते 5 प्रकारची फळे खाणे चांगले. जेणेकरून शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही आणि त्वचेला पूर्ण पोषण मिळू शकेल.

३) आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के फक्त पाणी आहे. यामुळेच त्वचारोग तज्ज्ञांपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकजण दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या, असे सांगतो. असे केल्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहते.

४) रात्री झोपण्यापूर्वी ताजे कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावा. यासाठी कोरफडीचे पान कापून त्यातून जेल काढा आणि हलक्या हातांनी मसाज करताना चेहऱ्यावर लावा मग झोपायला जा. सकाळी उठल्यावर तुमच्या त्वचेवर एक विशेष ताजेपणा दिसेल. नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा होतात.

स्ट्रेच मार्क्समुळे त्वचा खराब दिसतेय? स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे ५ उपाय, क्लिन दिसेल त्वचा

५) रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर व्हिटॅमिन-ई लावा. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन-ई कॅप्सूल वापरा. कॅप्सूल कापून द्रव बाहेर काढा आणि चेहऱ्यावर लावा आणि झोपी जा किंवा व्हिटॅमिन-ई युक्त नाईट क्रीम लावा. त्यांचा प्रभाव तुम्हाला एका रात्रीत दिसेल.

Web Title: How to Prevent Fine Lines Under Your Eyes : Under eye wrinkles home remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.