Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात केस गळाले-टक्कल दिसू लागलं? 'या' २ प्रकारचे तेल मिसळून लावा, केस वाढतील परत

ऐन तारुण्यात केस गळाले-टक्कल दिसू लागलं? 'या' २ प्रकारचे तेल मिसळून लावा, केस वाढतील परत

How To Prevent Hair Loss And Improve Bald Patches At Home : कमी वयात केस गळू नयेत आणि केसांची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी तुम्ही काही  उपाय करू शकता. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 12:25 PM2024-10-23T12:25:15+5:302024-10-23T14:52:45+5:30

How To Prevent Hair Loss And Improve Bald Patches At Home : कमी वयात केस गळू नयेत आणि केसांची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी तुम्ही काही  उपाय करू शकता. 

How To Prevent Hair Loss And Improve Bald Patches At Home By Content Creator Somya Bisla | ऐन तारुण्यात केस गळाले-टक्कल दिसू लागलं? 'या' २ प्रकारचे तेल मिसळून लावा, केस वाढतील परत

ऐन तारुण्यात केस गळाले-टक्कल दिसू लागलं? 'या' २ प्रकारचे तेल मिसळून लावा, केस वाढतील परत

आजकाल केस गळण्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच उद्भवते. (Hair Care Tips) अनेकांच्या डोक्यावर टक्कल पडलेलं दिसून येतं. स्काल्पवर काही ठिकाणी केस येतात तर काही ठिकाणी टक्कल पडलेलं असतं. कमी वयात केस गळू नयेत आणि केसांची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी तुम्ही काही  उपाय करू शकता. (How To Prevent Hair Loss) 

ब्युटी आणि स्किन केअरशी निगडीत कंटेंट सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या सौम्या बिसला यांनी एक प्रभावी उपाय  सांगितला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर हा उपाय शेअर केला आहे. (How To Prevent Hair Loss And Improve Bald Patches) २ प्रभावी तेलांनी तयार केलेला हा घरगुती उपाय तुमचे केस चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल हे तेल कसं लावतात ते समजून घेऊ. (How To Get Hairs On Scalp)

केस गळणं आणि पुन्हा त्या ठिकाणी केस न येणं या स्थितीला एलोपेसिया असं म्हणतात. नॅशनल लायब्रेरी ऑफि मेडिसिनच्या रिपोर्टनुसार एलोपेसिया एरिटा एक कोरोनिक इम्यून मेडिकेटेड ऑटोइम्यून डिसॉर्डर आहे  ज्यामुळे हेअर फॉलिकल्स आणि नखांवर परिणाम होतो. यात स्काल्पवर ठिकठिकाणी पॅचेस दिसून येतात आणि टक्कल दिसतं. 

सौम्या सांगतात प्रकारचे २ तेल केसांना लावा


कॅस्टर ऑईल ज्याला एरंडेल तेल असंही म्हटलं जातं. केसांसाठी हे तेल बरंच फायदेशीर ठरतं. यातील फॅटी एसिड्स केसांमध्ये आणि स्काल्पमध्ये शिरून पोर्सच्या आत जाऊन केसांना पोषण देतात. १० ते १२ थेंब रोजमेरीचे तेल केसांसाठी फायदेशीर ठरते. आजकालच्या हेअर प्रोडक्ट्समध्ये याचा वापर वाढला आहे. यातील एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण स्लाल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवतात आणि केसांना मजबूती मिळते. 

असं लावा तेल

हे मिश्रण बनण्यासाठी २ चमचे कॅस्टर ऑईल आणि १० ते १२ थेंब रोजमेरी इसेंशियल तेल मिसळून लावा. हे तेल गरम करा नंतर स्काल्पवर लावून मसाज करा.  १ ते २ तास केसांवर लावलेलं राहू द्या जर तुम्ही स्काल्पला आतून पोषण देऊ इच्छित असाल तर रात्रभर तसंच  सोडून द्या.

चांगल्या रिजल्टसाठी तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल लावू शकता. जेव्हा तुम्ही याचा वापर सुरू कराल तेव्हा मध्येच सोडू नका कारण नवीन केस उगवण्यास वेळ लागू शकतो.  प्रत्येकवेळी उपयोग केल्यानंतर तेल लावून व्यवस्थित शॅम्पूने धुवा. एरंडेल तेल खूपच घट्ट, जाड असते. जे लोक  केस गळण्याच्या समस्येपासून बचावासाठी केमिकल फ्री उपाय शोधत आहेत त्यांनी पेशंस ठेवायला हवेत, कारण सुधारणा दिसण्यास काही महिने लागू शकतात.

सौम्या सांगतात की एरंडेल तेल आणि रोजमेरीच्या तेलाच्या मिश्रणाचा उपयोग करून तुम्ही टक्कल पडलेल्या स्काल्पवर केस उगवू शकता. एरंडेल तेलात फॅटी एसिड्स असतात.  ज्यामुळे स्काल्प मॉईश्चराईज राहतो आणि केस  तुटणं कमी होतं. 
 

Web Title: How To Prevent Hair Loss And Improve Bald Patches At Home By Content Creator Somya Bisla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.