केस गळणे ही एक अतिशय कॉमन समस्या आहे. विशेष करून महिलांना केस गळायला लागले की फारच टेन्शन येते. आजकाल प्रत्येकजण केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्यांनी हैराण आहे. केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे, केस पातळ होणे यासोबतच केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसांची काळजी घेण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. खोबरेल तेलातील गुणधर्म केसांसाठी अधिक फायदेशीर असतात. सततची केसगळती होऊन काहीवेळा आपल डोकं आणि कपाळावरील केस कमी होऊन त्या जागी टक्कल दिसू लागते. एवढेच नव्हे तर केस विरळ झाल्याने डोक्यात जागोजागी टक्कल पडून पॅचेस तयार होतात. अशा भागातील केसांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही(How to Prevent Hair Loss).
हेअर ऑइलिंग ते हेअर मास्क हेअर केअर रुटीनमध्येही खोबरेल तेलाचा वापर होतो. पण केसांसाठी फक्त खोबरेल तेल पुरेसे नसते. केसांना खोबरेल तेल लावण्यापूर्वी त्यात आपण आणखी तीन प्रकारची तेलं मिसळून केसांना लावल्याने केसगळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हा उपाय केल्याने केसांना पोषण मिळेल, शिवाय केसांच्या अनेक समस्या सुटतील. खोबरेल तेलात नेमकी कोणत्या तीन प्रकारची तेलं मिक्स करावीत, ते पाहूयात(Best Oil for Hair Fall).
साहित्य :-
१. खोबरेल तेल - २ टेबलस्पून
२. एरंडेल तेल - ५ ते ६ थेंब
३. आवळ्याचे तेल - ५ ते ६ थेंब
४. रोझमेरी ऑईल - ५ ते ६ थेंब
आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...
'हे' ३ पदार्थ खा आणि स्किन प्रॉब्लेम्स कायमचे विसरा, ऋजुता दिवेकर यांचा खास सल्ला...
हे तेल कसं तयार करायचं ?
सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून खोबरेल तेल घेऊन त्यानंतर त्यात प्रत्येकी ५ ते ६ थेंब एरंडेल तेल, आवळ्याचे तेल, रोझमेरी ऑईल घेऊन ही सगळी तेलं चमच्याने व्यवस्थित हलवून एकमेकांत मिसळून घ्यावीत. त्यानंतर हे तयार तेल एका एअर टाईट काचेच्या बाटलीत स्टोअर करून ठेवावे.
या तेलाचा वापर कसा करावा ?
आठवड्यातून २ ते ३ वेळा रात्री झोपताना हे तेल केस ज्या भागात विरळ झाले आहेत त्यात भागात लावून घ्यावे. कपाळावर, टाळूवर किंवा डोक्यावरील ज्या ज्या भागात केस विरळ दिसतात त्या भागात लावून मसाज करून घ्यावा. हे तेल केसांवर रात्रभर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवावेत. हा उपाय केल्याने काही दिवसांतच डोक्यावरील विरळ झालेल्या भागातील केस पुन्हा येऊन त्यांची चांगली वाढ होताना दिसेल.