केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची हेअर केअर उत्पादनं वापरतात. तर काहीजण शॅम्पू वापरतात. केमिकल्सयुक्त शॅम्पूमुळे केस गळणं वाढतं. (How to prevent hair loss) ज्या दिवशी केस धुतले जातात तेव्हा घरभर केस पसरतात आणि कंगव्यात अडकूनही तुटतात. अशात हेअर वॉश करताना तुम्ही काही घरगुती वस्तूंचा वापर केला तर केस काळे, दाट-लांब होण्यास मदत होईल. (How to Properly Wash Your Hair) केस धुण्यासाठी कोणते नैसर्गिक घटक वापरता येतील ते पाहूया. केसांवर घरगुती उपाय केल्यानं खर्च वाचेल याशिवाय साईड इफेक्ट्सही उद्भवणार नाहीत. (How to stop hair fall)
मेथीच्या बीया
केस धुण्यासाठी चार ते पाच चमचे मेथीच्या बिया चार तासांसाठी किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर पाण्यातून बाहेर काढून मिक्सरमधून वाटून पेस्ट बनवा. ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात २ चमचे दही आणि एक चमचा मध मिक्स करा. नंतर ही पेस्ट केसांना १ ते २ तासांसाठी लावून ठेवा मग हेअर वॉश करा.
मुल्तानी माती
मुल्तानी माती तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता. यासाठी मुल्तानी माती थोड्या पाण्यात मिसळून चार ते पास तासांसाठी भिजवून ठेवा. ही पेस्ट केसांना अप्लाय करून १ तासांसाठी तसंच लावलेले राहू द्या. त्यानंतर स्काल्प आणि केसाच्या केसांच्या लांबीला लावून स्वच्छ करा. नंतर साध्या पाण्यानं केस धुवा.
दही-लिंबू
हेअर वॉश करण्यासाठी तुम्ही दही किंवा लिंबाचा वापर करू शकता. हे एक उत्तम कंडीशनरच्या स्वरूपात काम करेल. हा उपाय करण्यासाठी २ ते ३ चमचे दह्यात लिंबाचा रस मिसळा त्यानंतर हे मिश्रण अर्ध्या तासासाठी केसांना लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा.
रिठा
सगळ्यात आधी रिठा रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर याची पातळ पेस्ट बनवा आणि नारळाच्या तेलात एक चमचा भृंगराज तेल घालून उकळा त्यानंतर केसांना लावून तसेच ठेवा. २ तासांनी रिठाच्या पेस्टने केस धुवा नंतर कसे स्वच्छ पाण्याने क्लिन करा.