Join us  

How to Prevent Hair Loss : केस खूप गळतात, टक्कल पडण्याची भिती वाटते? ४ सवयी सोडा, केस दिसतील दाट, राहतील छान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 1:07 PM

How to Prevent Hair Loss : प्रदूषण आणि रसायनांचा प्रभाव टाळणे कठीण आहे, परंतु रोजच्या आहारात पौष्टिक गोष्टी घेतल्यास केस मजबूत होऊ शकतात.

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. कधी वाढते वय, कधी हानिकारक शॅम्पू, कधी वाढते प्रदूषण तर कधी शरीरातील पोषक तत्वांची कमतरता हे केस गळण्याचे कारण बनतात. केस गळणे ही सामान्य गोष्ट असली तरी केस जास्त गळायला लागले आणि पुन्हा वाढणार नसतील तर ही चिंतेची बाब आहे. सतत केस गळल्याने टक्कल पडू शकते.  जाणून घेऊया केस गळणे कसे थांबवायचे. (How to Prevent Hair Loss in Men and Women)

केस गळणं कसं थांबवायचे?

प्रदूषण आणि रसायनांचा प्रभाव टाळणे कठीण आहे, परंतु रोजच्या आहारात पौष्टिक गोष्टी घेतल्यास केस मजबूत होऊ शकतात. ज्यामुळे केस गळणे कमी होईल आणि नवीन केस देखील येऊ लागतील. आहारात काही आवश्यक पोषक घटकांचा समावेश करून आपण टक्कल पडणे टाळू शकतो.

जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ; तज्ज्ञांचा दावा

प्रोटिन डाएट

प्रथिने केसांसाठी आवश्यक घटक आहे. केसांच्या वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळतात. टक्कल पडू नये म्हणून आहारात अधिकाधिक प्रथिनांचा समावेश करावा. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी मासे, अंडी आणि दूध यांचे सेवन करावे. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कडधान्ये आणि काजू यांचा समावेश करू शकता. त्यांच्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रथिने गळलेले केस पुन्हा वाढण्यास मदत करतात.

निरोगी दीर्घायुष्यासाठी फक्त ६ गोष्टी करा; कायम दिसाल फिट-तरुण

व्हिटामीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश

व्हिटॅमिन ई केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस गळण्याची समस्या असल्यास जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या गोष्टींचे सेवन करावे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, ते खाणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

कॅल्शियम

केसांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि तुटतात. केस गळतीवर, कॅल्शियम भरपूर असलेले दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन सुरू करा. कॅल्शियमची कमतरता पूर्ण झाल्यावर केस मजबूत होतात आणि गळणे थांबते. आहाराव्यतिरिक्त केसांची निगाही खूप महत्त्वाची आहे. केस गळणे थांबवण्यासाठी मसाज चांगला करावा. केस वेळोवेळी धुवावेत, कारण केस गळणे केसांमध्ये जास्त धूळ गेल्यास सुरू होते. केसांमध्ये रसायने वापरण्याऐवजी आयुर्वेदिक उत्पादने वापरावीत.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स