Join us  

वॅक्सिंग केल्यावरही त्वचेवर बारीक बारीक टोकदार केस येतात? ५ टिप्स- इनग्रोन हेअरचा त्रास कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 1:16 PM

How To Treat & Prevent Ingrown Hairs After Waxing : बारीक केस अर्थात इनग्रोन हेअरची समस्या अनेकींना छळते, अशावेळी काय करायचं?

आपल्या त्वचेवरील जास्तीचे केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग असे अनेक पर्याय निवडतो. आपल्यापैकी बहुतेक महिला दर महिन्याला आपल्या काही खास अवयवांवरील केस अवश्य काढून टाकतात. यामध्ये आयब्रो, हाता - पायांचे वॅक्सिंग, अंडरआर्म्स, अप्पर लिप्स यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. शरीरावरील हे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग, शेव्हिंग अशा अनेक पर्यायांचा अवलंब करतो. अनेकदा शेव्हिंग आणि वॅक्सिंग केल्यानंतर, कधीकधी आपल्या शरीरावर लहान केस उरतात, ज्यांना 'इनग्रोन हेअर' म्हणतात. आपल्यापैकी अनेकांना वॅक्सिंगनंतर केस उगवण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्वचेतून निघणारे हे छोटे टोकदार केस फारच विचित्र दिसतात.

वॅक्सिंगमुळे आपले केस व्यवस्थित आपल्या त्वचेवरुन काढले जातात. परंतु, कधीकधी ते व्यवस्थित काढले जात नाहीत किंवा त्वचेमध्ये अडकले जातात. जेव्हा वॅक्सिंग योग्य प्रकारे केले जात नाही, तेव्हा इनग्रोन केसांची भरपूर वाढ होण्याची शक्यता असते. हे सहसा अशा ठिकाणी होते जेथे केसांची वाढ जास्त असते. वॅक्सिंग केल्यानंतर आपली त्वचा बाळाच्या त्वचेसारखी मऊ आणि कोमल बनते. पण, काही वेळा आपल्या शरीरावर काही लहान केस राहतात किंवा त्वचेच्या आत अनेक छोटे काळे डाग राहतात. वास्तविक, या काळ्या डागांच्या आत केस असतात, या 'इनग्रोन हेअरची' आपल्या शरीरावर वाढ होऊ नये यासाठी काही टिप्स लक्षात ठेवू(How to Prevent Ingrown Hairs After Waxing Using Home Remedies).

'इनग्रोन हेअर' म्हणजे काय?

वॅक्सिंग, शेव्हिंग किंवा रेझर वापरल्यानंतरही त्वचेवर उग्र, हलके काटेरी केस राहतात. हे केस छिद्रातून बाहेर येण्याऐवजी त्वचेच्या आत वाढतात, या केसांना 'इनग्रोन हेअर' म्हणतात. असे नको असलेले अंगावरचे केस आपल्या त्वचेचे सौंदर्य कमी करतात.

 

'इनग्रोन हेअर' त्वचेवर का वाढतात ?

वॅक्स, शेव, थ्रेडींग किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आपण त्वचेवरील केस काढतो. परंतु, जेव्हा हे केस समान रीतीने तुटत नाहीत तेव्हा मृत त्वचा केसांच्या कूपांना चिकटते, ज्यामुळे केस वाढण्याची समस्या उद्भवते.

नक्की काय करता येऊ शकते ? १. त्वचा एक्सफोलिएट करुन घ्यावी :- वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचा एक्सफोलिएट करुन घेणे ही एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. त्वचा एक्सफोलिएट करुन घेतल्याने आपल्या शरीरावरील मृत त्वचा सहजपणे काढून टाकली जाते. आपल्या शरीरावरील मृत त्वचा वॅक्सिंग करण्यापूर्वी अवश्य काढावी, नाहीतर वॅक्सिंग व्यवस्थित होत नाही किंवा शरीरावरील केस काढण्यास अडथळा निर्माण होत. वॅक्स, शेव, थ्रेडींग किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आपण त्वचेवरील केस काढतो. परंतु, जेव्हा हे केस समान रीतीने तुटत नाहीत तेव्हा मृत त्वचा केसांच्या कूपांना चिकटते, ज्यामुळे 'इनग्रोन हेअर' वाढण्याची समस्या उद्भवते. एक्सफोलिएशन केल्यामुळे, वॅक्सिंग करताना केस मध्येच अर्धवट न तुटता किंवा त्वचेत अडकल्याशिवाय ते सहजपणे काढण्यात मदत होते. एक्सफोलिएशन केल्यामुळे आपणास वॅक्सिंग करताना फार दुखल्याचा अनुभव न येता, वॅक्सिंग अगदी सहजपणे होण्यास मदत होते.  एवढेच नव्हे तर यामुळे केसांच्या निरोगी वाढीस देखील मदत होते. वॅक्सिंग करण्यापूर्वी ऑरगॅनिक बॉडी स्क्रबने तुमची त्वचा एक्सफोलिएट करुन घ्यावी. 

अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...

 त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी :- 

१. एक्सफोलिएटिंग ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे मृत त्वचा काढून टाकली जाते. जेव्हा आपण आपली त्वचा एक्सफोलिएट करतो तेव्हा केस सहजपणे बाहेर येतात आणि ही प्रक्रिया अंतर्भूत केसांच्या वाढीस प्रतिबंध करते आणि केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते. यासाठी बॉडी स्क्रब केले जाते.

२. यासाठी वॅक्सिंग किंवा शेव्हिंगनंतर एक-दोन दिवसांनी गरम पाण्यात टॉवेल पिळून तुमच्या त्वचेवर वॅक्स असलेल्या ठिकाणी वाफ काढा. काही वेळ असे टॉवेल ठेवा, यामुळे त्वचेवर साचलेली सर्व घाण निघून जाईल, डेड स्किन आपोआप निघून जाईल आणि छिद्रही उघडतील.

३. या व्यतिरिक्त, दररोज आपल्या शरीराला तेल लावा किंवा चांगल्या मॉइश्चरायझरने दररोज मसाज करा, जेणेकरून केस सहजपणे बाहेर येतील आणि ते वाढलेल्या केसांमध्ये बदलणार नाहीत. तुम्ही ऑरगॅनिक बॉडी स्क्रबनेही त्वचा एक्सफोलिएट करू शकता.

२. सेल्फ वॅक्सिंग करताना खबरदारी घ्या :- वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी अनेक स्त्रिया घरी स्वतःचे वॅक्सिंग करतात. स्वतःचे वॅक्सिंग स्वतः करताना ते फक्त योग्यरित्या करणे आवश्यक आहे. अन्यथा, ते तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकते आणि त्वचेच्या अनेक समस्या निर्माण करू शकते. वॅक्सिंग साठी त्वचा रेडी  करण्यापासून ते वॅक्सिंगपर्यंतच्या सर्व पायऱ्या व्यवस्थित खबरदारी घेऊन केल्याचं पाहिजेत. आपल्या शरीरावरील केस तुटू न देता, त्वचेवर व्यवस्थित वॅक्सिंग करण्यासाठी तुम्ही सर्व काही नीट काळजीपूर्वक केले पाहिजे.

३. घट्ट कपडे परिधान करणे टाळा :- आपल्या शरीराच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे उपचार किंवा वॅक्सिंग केल्यानंतर आपली त्वचा संवेदनशील बनते. वॅक्सिंगनंतर घट्ट कपडे घालू नये कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. संसर्ग टाळण्यासाठी तुमच्या त्वचेला मोकळ्या हवेची गरज असते आणि घट्ट कपडे घातल्याने त्वचेला हवी तशी मोकळी हवा मिळत नाही. परिणामी, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. घट्ट कपडे घातल्यामुळे, आपल्या त्वचेवरील 'इनग्रोन हेअर' कपड्यांखाली दबले जातात किंवा मागे खेचले जातात. यामुळे या इनग्रोन हेअर्सना इजा पोहोचू शकते, तसेच त्या भागावरच्या त्वचेसंबंधित वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

४. वॅक्सिंगसाठी साखरेचा वापर करावा :- वॅक्सिंग करताना वॅक्स किंवा मेणाऐवजी साखरेचा वापर करावा. शुगर वॅक्सिंग करताना आपल्या त्वचेवरील केस सहजरित्या काढण्यासाठी वॅक्स किंवा मेणाऐवजी साखरेचा वापर केला जातो. वॅक्सिंग  करुन त्वचेवरील केस काढत असताना, केस ज्या दिशेत वाढत आहेत त्याच दिशेने वॅक्सिंग करताना खेचावे. यामुळे त्वचेवरील केस न दुखता काढणे सोपे जाते तसेच त्वचेला देखील फारशी इजा होत नाही. केस ज्या दिशेने वाढत आहेत त्याच दिशेने शेव्हिंग करणे आवश्यक आहे. उलट दिशेने शेव्हिंग केल्याने अंगावरचे केस वाढतात आणि त्वचेवर लहान मुरुम येतात. वॅक्सिंग करताना त्वचेवरील केस वाढीच्या दिशेने खेचले तर यामुळे केसांवरील ताण कमी होऊन ते पटकन निघतात. 

५. शेव्हिंग करताना त्वचा ओढू नका :- रेझरने शेव्हिंग करताना, तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. परंतु, तुम्हाला खूप मऊ हातांनी शेव्हिंग करावी लागेल. अन्यथा, काही लहान केस मुळांमध्ये शिल्लक राहतात, जे बाहेर येण्याऐवजी आतील बाजूस वळतात आणि वाढू लागतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी